'पळून गेलेले ते देशपांडेच ना..', शिवसेनेच्या अंधारेंची बोचरी टीका

मुंबई
Updated Sep 23, 2022 | 22:16 IST

Sushma Andhare: दसरा मेळाव्यासंदर्भात उच्च न्यायालतील सुनावणी शिवसेनेच्या बाजूने आल्यानंतर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देताना मनसेचा देखील समाचार घेतला.

Shiv Sena: मुंबई: 'पालिकेच्या अडून सत्तेचा गैरवापर करत रडीचा डाव खेळाला गेला.' अशी टीका शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दिली. उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला. पण याचवेळी त्यांच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. (shiv sena leader sushma andhare criticized mns leader sandeep deshpande)

मनसेवर टीका

'मला मनसेच्या प्रवक्त्यांबद्दल काहीच बोलायचं नाहीए. कारण काल कोणी तरी सेनेला बोलत होतं. काय नाव त्यांचं ते.. देशपांडे ना ते... हा ते पळून गेलेले देशपांडेच ना.. हा पळून गेले होते ते.' 

'एकीकडे लोकांना उकसवतात आणि दुसरीकडे साध्या 149 च्या नोटीसला घाबरून ते पळून जातात. अशा पळपुट्या प्रवक्त्यांबद्दल काय बोलायचं आपण.. सोडून द्या. चिल्लर लोकांबद्दल बोलू नये आपण.' अशी टीका अंधारे यांनी केली आहे. 

न्यायदेवतेवर मला विश्वास आहे. पालिकेच्या अडून सत्तेचा गैरवापर करत रडीचा डाव खेळाला जातो. मागच्या 55 वर्षात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. मग या वर्षी जावई शोध कोणी लावला आणि कसा लागला? असा सवाल करत त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी