Shinde Group Song: मुंबई: शिवसेनेचे नेते स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी 'शिवसेना स्फूर्तीगीत' हे शिवसेनेचे नवे गाणे आज लाँच केले. काल उद्भव ठाकरे यांनी आनंद शिंदे यांना घेऊन शिवसेनेचे गाणे तयार करण्याची चर्चा मुरू असतानाच आज थेट गाणे लाँच करून दोन गटात सुरू असलेल्या टीझर वॉरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आघाडी घेतली आहे.
'आम्ही शिवबाचे धारकरी.. शिवसेनेचे मानकरी' अशा ओळी असलेले हे गाणे गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेनुसार 'प्रभारंग फिल्म्स्' यांनी तयार केले असून आदर्श शिंदे यांनी ते गायले आहे.
निमति संदीप माने, कार्यकारी निर्मात्या उर्मिला हिरवे, गीतकार संतोष सातपुते, संगीतकार पार्थ उमराणी, एडिटर सत्यजित पाटील, शरद डहाळे या टीम ने अत्यंत कमी वेळेत हे गीत तयार करण्याचे आव्हान पूर्ण केले.
आज स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीने पत्रकार परिषदेत ते लाँच करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे नेते तसेच 'प्रभारंग फिल्म्स' चे संचालक संदिप माने, संचालक उर्मिला हिरवे, शरद डहाळे आदी उपस्थित होते.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.