Sanjay Raut : राज्यपालांनी इतका अभ्यास करू नये, शिवसेना खासदार संजय राऊत यांची टीका, सध्या राजभवानात अभ्यासाचे अजीर्ण झाल्याचीही टिप्पणी

मुंबई
Updated Dec 28, 2021 | 15:13 IST

Sanjay Raut on governor bhagat singh koshyari राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे अभ्यासू आणि विद्वान आहे. परंतु त्यांनी इतका अभ्यास करू नये अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच सध्या महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये सध्या अभ्यासाचे अजीर्ण झाले आहे त्यामुळे जर कुणाला अजीर्णाचा त्रास झाला असेल तर त्यासाठी महाराष्ट्राचे आरोग्य खाते सक्षम आहे असेही राऊत म्हणाले.

थोडं पण कामाचं
  • राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे अभ्यासू आणि विद्वान आहे.
  • परंतु त्यांनी इतका अभ्यास करू नये
  • तर सरकारला राजकीय पावले टाकावी लागतील

Sanjay Raut : मुंबई :  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagatsing koshari) हे अभ्यासू आणि विद्वान आहे. परंतु त्यांनी इतका अभ्यास करू नये अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut )यांनी केली आहे. तसेच सध्या महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये सध्या अभ्यासाचे अजीर्ण झाले आहे त्यामुळे जर कुणाला अजीर्णाचा त्रास झाला असेल तर त्यासाठी महाराष्ट्राचे आरोग्य खाते सक्षम आहे असेही राऊत म्हणाले. (shivsena leader and mp criticized maharashtra governor rajyapal bhagatsingh koshyari over assemblly speaker election )

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आवाजी मतदान पद्धतीने निवडणूक व्हावी अशी विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली आहे. परंतु अशा प्रकारची निवडणूक घटनाबाह्य असल्याची भूमिका राज्यपाल कोश्यारी यांनी घेतली आहे. 

त्यावर राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राज्यपालांचे काय उत्तर आहे त्यात मला पडायचे नाही, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे उत्तर पाठवले आहे ते तुमच्यासमोर आहे. राज्यपालांनी इतका अभ्यास करू नये. जे घटनेमध्ये ज्या तरतुदी करण्यात आल्या आहेत त्यासाठी राज्यपालांची नेमणूक केली जाते .  विधानसभेचे हक्क, सरकारच्यास शिफारसी लोकभावना या डावलून काम करण्यासाठी राज्यपालांची नेमणूक केली जात नसते. राज्यपाल अभ्यासू आहेत विद्वान आहेत. परंतु या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये. सध्या महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये अभ्यासाचे अजीर्ण झाले आहे. अजीर्ण झाल्यानंतर पोटाचा त्रास होतो. असा त्रास जर कुणाला झाला असेल तर महाराष्ट्राचे आरोग्य खाते त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सक्षम आहे असेही राऊत म्हणाले.

राज्याचे हिवाळी अधिवेशन विधीमंडळात उत्तम पद्धतीने सुरू झाल्याचे राऊत म्हणाले. तसेच  या अधिवेशनाचा आजचा शेवटाचा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिथेत आहेत तिथून ते अधिवेशन पूर्णपणे नियंत्रित करत असून, सरकारच्या कामकाजात सहभागी होत आहेत. आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे वेट अँड वॉच असे सूचक विधान राऊत यांनी केले आहे. तर आघाडीत कुठेच बिघाडी नसल्याचे स्पष्टीकरण देत राज्यपाल जर घटनेच्या विरूध्द वागत असतील राज्यपालांनी राजकीय वर्तन करण्याचा दबाव असेल तर सरकारला राजकीय पावले टाकावी लागतील असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी