ramdas kadam criticised anil parab : अनिल परब गद्दार, रामदास कदमांचा आरोप

मुंबई
Updated Dec 18, 2021 | 18:05 IST

shivsena leader ramdas kadam criticised anil parab शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर थेट पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप केला.

थोडं पण कामाचं
  • अनिल परब गद्दार, रामदास कदमांचा आरोप
  • शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गहाण ठेवण्याचे काम अनिल परब यांनी केल्याचा आरोप
  • शिवसेना या पक्षाचे प्रमुख अनिल परब आहेत की उद्धव ठाकरे असा सवाल

shivsena leader ramdas kadam criticised anil parab : मुंबईः शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर थेट पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप केला. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गहाण ठेवण्याचे काम अनिल परब यांनी केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. शिवसेना या पक्षाचे प्रमुख अनिल परब आहेत की उद्धव ठाकरे असा 'रोखठोक' सवाल केला.

रामदास कदम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे शिवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू आहे ही 'सच्चाई' जगजाहीर झाली. महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांमध्ये काही मुद्यांवर तीव्र मतभेद असल्याचे समोर आले.

दापोली येथील अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी कदम यांनी भाजपा नेते किरीट सोमैय्या यांना मदत केल्याचा आरोप रामदास कदम यांच्यावर करण्यात आला होता. त्याची ऑडियो क्लिप व्हायरल झाली. यानंतर कदम यांचे समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या पदांवरुन दूर करायला सुरुवात झाली. अखेर स्वतःची बाजू मांडण्यासाठी रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेतली. 

मागील दोन वर्षांपासून अनिल परब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी वगळता एरवी ते जिल्ह्यात फिरकले नाहीत. अनिल परब यांनी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे. एसटी महामंडळाचे कर्मचारी उपोषण करत आहेत, आंदोलन करत आहेत. पण या आंदोलकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनिल परब यांच्याकडे वेळ नाही. अनिल परब यांच्या विरोधात बोलणे म्हणजे शिवसेनेच्या विरोधात बोलणे असे होते का?; असा सवाल रामदास कदम यांनी केला. 

आपल्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब आग्रही होते. यासाठी राष्ट्रवादीच्या संजय कदम यांना घेऊन ते मातोश्रीवर गेले होते. पण उद्धव ठाकरेंनी त्यांचे ऐकले नाही. माझ्या मुलाला योगेश कदम यालाच तिकीट दिले. त्याचा राग परब यांनी मनात ठेवला. मला आणि माझ्या मुलाला संपवण्यासाठी अनिल परब काम करत आहेत असा आरोप रामदास कदम यांनी केला. 

नगर पंचायत निवडणुकीत माझ्या मुलाला डावलण्यात येत आहे. तो स्थानिक आमदार आहे. पण त्याला बाजुला ठेवून राष्ट्रवादीशी चांगले संबंध असलेल्या मंडळींना उमेदवारी वाटण्याचे प्रकार सुरू आहेत. अनिल परब यांनी राष्ट्रवादीचे संजय कदम, सुनील तटकरे, सूर्यकांत दळवी आणि शिवसेना नेते उदय सामंत यांना मुंबईच्या कार्यालयात बोलवून घेतले आणि तिकीट वाटप केले. शिवसेनेची ताकद जास्त असूनही राष्ट्रवादीला जास्त जागा देण्यात आल्या. शिवसेनेचे नगरसेवक जास्त असूनही पहिली अडीच वर्ष नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा असणार आहे. आम्ही संघर्ष करून मिळवलेला मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचे काम अनिल परब करत आहेत. ज्यांनी शिवसेना मोठी केली आणि राष्ट्रवादी गाडली त्यांचीच हाकलपट्टी करण्यात आली; असा घणाघाती आरोप रामदास यांनी केला.

अनिल परब हे राष्ट्रवादीचे नेते असल्यासारखे बोलतात; असा टोला रामदास कदम यांनी लगावला. पक्षाशी निष्ठावान राहूनही डावलले जात आहे; असे रामदास कदम म्हणाले. 'आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेनाप्रमुख ही उद्धव ठाकरे आहेत की अनिल परब आहेत? असा प्रश्न आम्हाला पडला आहे;' अशा स्वरुपाचे वक्तव्य रामदास कदम यांनी केले. बोलताना ते भावूक झाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी