आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची शिवसेनेच्या हालचाली सुरू... 

मुंबई
Updated Jun 13, 2019 | 17:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

ठाकरे कुटुंबातील पहिला मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेना सरसावली असून आदित्य ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याचे काम शिवसेनेने सुरू केले आहे. 

sanjay raut
संजय राऊत 

मुंबई :  शिवसेना नेते आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस या दिवसापासून त्यांना महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याचे काम शिवसेना नेत्यांनी सुरू केले आहे.  ठाकरे कुटुंबातील पहिला सदस्य हा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चांना लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर उधाण आले होते. त्यानंतर आदित्य ठाकरे यांना मीडियाला पत्ता न लागू देता सुरक्षित मतदार संघाची चाचपणी सुरू केली आहे. यात शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्याबाबत एक मोठे आणि सूचक विधान केले आहे. ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारावे, असे राज्यातील जनतेला वाटत आहे. एका युवा आणि तडफदार नेतृत्त्वाच्या हातात राज्याची सत्ता द्यावी असे जनतेला वाटते आहे, असे म्हणून राऊत यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. 

आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी या संदर्भात युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी एक ट्विट केले होते. यावेळी भाजप आणि सेनेच्या युतीचा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निम्म्या जागांचा म्हणजे फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला समोर आला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या चर्चेत तसे ठरले होते. तसेच या बैठकीत युती करण्यासाठी शिवसेनेकडून एक अट ठेवण्यात आली होती. त्यात आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्री पद मिळावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर अमित शहा यांना आदित्य ठाकरे यांना पद दिले असे म्हणून युतीवर शिक्कामोर्तब केले होते. त्याचा धागा पुढे धरून शिवसेनेकडून आता आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याचे काम आज त्यांच्या वाढदिवसापासून सुरू केले असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. 

संजय राऊत आणि इतर शिवसेना नेत्यांनी मागणी केली की आदित्य ठाकरे यांनी आगामी विधानसबा निवडणूक लढावावी. तसे सुरक्षित मतदार संघ निवडण्यासाठी युद्धपातळीवर शिवसेनेकडून काम सुरू आहे.  आदित्य ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश बाळासाहेबांच्या उपस्थिती युवा सेनेच्या माध्यमातून केला. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलन केली. तसेच मुंबई विद्यापीठ आणि महाविद्यालयीन निवडणुकीत प्रभावी नेतृत्व केले. त्याचे बक्षिस म्हणून आदित्य ठाकरे यांना शिवसेनेचे नेते पद देण्यात आले. 

दरम्यान, आज युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मातोश्री येथे आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत मात्र आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याच्या प्रश्नावर काहीही बोलण्यास नकार दिला.  ठाकरे कुटुंबियात अद्याप एकाही सदस्याने सक्रीय राजकारणात सहभाग घेतला नाही. जनतेमधून निवडून कोणीच सत्ता पदावर गेले नाही. बाळासाहेब ठाकरे यांनीही नेहमी रिमोट कंट्रोलची भूमिका निभावली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही खूर्चीपासून दूर राहून राजकारण करण्याचा निर्णय घेतला. पण आता ठाकरे कुटुंबियांनी आपले राजकारण बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे गेल्या काही दिवसांतील घडामोडींवर सिद्ध होत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे निवडणूक लढविणार की नाही हे आगामी काही काळात स्पष्ट होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची शिवसेनेच्या हालचाली सुरू...  Description: ठाकरे कुटुंबातील पहिला मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेना सरसावली असून आदित्य ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याचे काम शिवसेनेने सुरू केले आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles