शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडाला ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी

Showik Chakraborty Samuel Miranda Sent to NCB Custody Till September 9 अंमली पदार्थ खरेदी-विक्री व्यवहार प्रकरणी शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना कोर्टाने ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी दिली.

Showik Chakraborty Samuel Miranda Sent to NCB Custody Till September 9
शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडाला एनसीबी कोठडी 

थोडं पण कामाचं

  • शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडाला ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी
  • बासित परिहार आणि जैद या दोघांना ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी
  • कैजानला चौदा दिवसांची एनसीबी कोठडी, नंतर जामीन

मुंबईः अंमली पदार्थ खरेदी-विक्री व्यवहार प्रकरणी शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना कोर्टाने ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी (Narcotics Control Bureau  -  NCB) कोठडी दिली. या कालावधीत एनसीबी दोन्ही आरोपींची चौकशी करुन पुढील तपास करेल. (Showik Chakraborty Samuel Miranda Sent to NCB Custody Till September 9)

अभिनेता सुशांत याच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी वेगवेगळ्या शक्यतांच्या आधारे तपास सुरू आहे. या तपासाचा भाग म्हणून संशयितांचे मोबाइल ताब्यात घेऊन तपासण्यात आले. त्यांनी डीलीट केलेले मेसेज रिस्टोअर करुन बघितले गेले. या प्रक्रियेत शौविक आणि सॅम्युअल अंमली पदार्थांच्या संदर्भात एकमेकांशी तसेच अन्य व्यक्तींशी संवाद साधत असल्याचे मेसेज आढळले. एनसीबीने मुंबईतून अंमली पदार्थ पुरवणाऱ्या काही व्यक्तींना अटक केली. या व्यक्तींनीही शौविक आणि सॅम्युअलसोबत अंमली पदार्थांचे व्यवहार केल्याची कबुली दिली. यानंतर एनसीबीने शौविक आणि सॅम्युअलला अटक केली. 

सखोल चौकशीसाठी शौविक आणि सॅम्युअलची सात दिवसांची कोठडी मिळावी, अशी मागणी एनसीबीने केली. कोर्टाने ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी दिली आहे. या कालावधीत होणाऱ्या चौकशीआधारे पुन्हा एकदा शौविक आणि सॅम्युअलला एनसीबी कोर्टासमोर सादर करेल. 

एनसीबीने सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्ती या दोघांविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act - NDPS ACT) कलम ८ क, २० ब, २७ अ, २८ आणि २९ अंतर्गत आरोप ठेवले आहेत. यात दोषी आढळल्यास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्ती विरोधात एनसीबीने अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीचे आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका ठेवला आहे.

शौविक आणि सॅम्युअल प्रमाणेच बासित परिहार आणि जैद या दोघांना ९ सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी देण्यात आली. तर कैजानला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. मात्र थोड्या वेळाने त्याने कोर्टात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला, हा अर्ज मंजूर झाला आणि त्याला जामीन मिळाला.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती तसेच आणखी काही जणांची एनसीबी कसून चौकशी करण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत या प्रकरणात आणखी धरपकड होण्याची शक्यता आहे. या निमित्ताने बॉलिवूडमधील (Bollywood) अंमली पदार्थांच्या व्यवहारांशी संबंधित नवी माहिती उजेडात येईल, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. 

मुंबईत अभिनेता सुशांत याच्या घरात पार्ट्यांचे आयोजन व्हायचे अशी चर्चा आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्यामुळे तपास पथकाने जास्त माहिती दिलेली नाही. पण पार्ट्यांचा आरोप खरा ठरला तर त्याचा संबंध सुशांतच्या मृत्यूशी आहे का हे तपासले जाणार आहे. 

सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील घरात बेडरूमध्ये १४ जून रोजी सकाळी आढळला होता. सुशांतने गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्याचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पीठानी आणि सुशांतच्या नोकरांनी सांगितले. पोलीस येण्याआधीच आपण सुशांतचा फासाला लटकलेला मृतेदह उतरवून बेडवर ठेवल्याची माहिती सिद्धार्थने दिली. या प्रकरणात सुशांतच्या नातलगांनी पोलीस तक्रार केली. सुशांतच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरल्याचा ठपका सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती तसेच तिच्या कुटुंबातील सदस्यांसह अन्य काही जणांवर ठेवला. या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने सुरू केला. सुशांतच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी सीबीआय (CBI), सुशांतच्या पैशांचा गैरवापर झाला का याचा तपास करण्यासाठी इडी (ED) आणि सुशांत प्रकरणात अंमली पदार्थांचा वापर झाला का याचा तपास करण्यासाठी एनसीबी चौकशी करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी