Belgaum Dispute : बेळगाव : महाराष्ट्राच्या सीमा समन्वयक मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावसह सीमा भागात तणावाची परिस्थिती निर्माण झालीये. एकीकडे कर्नाटकाच्या सूचनेवरून सीमा समन्वयक मंत्र्यांनी आपला दौरा रद्द केलेला असताना दुसरीकडे याच मंत्र्यांचा निषेध करण्यासाठी कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते बेळगाव येथे दाखल झालेत. यामुळे बेळगावमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त, टोलनाक्यांवर अडवणूक आणि तपासणी सुरूये. अशा साऱ्या वातावरणात एकंदरच बेळगावची भट्टी चांगलीच तापलेली आहे. (stone pelting on maharashtra vehicle in belgaum over maharashtra karnataka border dispute)
दोन डिसेंबर रोजी सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि शंभूराज देसाई बेळगावच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र काही कारणांनी तो दौरा सहा डिसेंबरला पुढे ढकलण्यात आला. याच पार्श्वभूमीवर कन्नड रक्षण वेदिकेचे अध्यक्ष नारायण गौडा यांनी बेळगावात आंदोलन करून या सीमा समन्वयक मंत्र्यांचा निषेध करणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर सहा डिसेंबरचा दौरा रद्द झाला असला तरीही कन्नड रक्षण वेदीकेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने बेळगाव परिसरात दाखल झालेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.