SSR Case: एक युवा नेता CBIसमोर चौकशीसाठी स्वत: जाण्याची शक्यता, भाजप नेत्याचा दावा

Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. त्यानंतर आता सीबीआयटी टीम मुंबईत तपासासाठी दाखल झाली आहे. याच दरम्यान भाजपने एक दावा केला आहे. 

Sushant Singh Rajput
सुशांत सिंह राजपूत  |  फोटो सौजन्य: IANS
थोडं पण कामाचं
  • सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयची टीम मुंबईत दाखल 
  • भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेश नाखुआ यांनी ट्वीट करुन केला खळबळजनक दावा 
  • सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एक युवा नेता स्वत:हून सीबीआयसमोर चौशीसाठी जाऊ शकतो : सुरेश नाखुआ

मुंबई : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI)कडे सोपवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सीबीआयची टीम तपासासाठी मुंबईत दाखल झाली आहे. सीबीआयच्या टीमकडून तपासाला सुरूवात झाली आहे. सुशांतचा कूक नीरज याची चौकशी करण्यासाठी वांद्रे येथे पोहोचली. तसेच मुंबई पोलीस उपायुक्त (Mumbai Police) अभिषेक त्रिमुखे यांचीही भेट घेतली. सुशांत प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्याच नेत्रृत्वात सुरू होता. त्याच दरम्यान आता भाजप नेते सुरेश नाखुआ (BJP Leader Suresh Nakhua) यांनी ट्वीट करुन एक मोठा दावा केला आहे.

भाजप नेते सुरेश नाखुआ यांनी ट्वीट करुन म्हटलं, "अत्यंत विश्वसनीय स्त्रोत: एक तरुण राजकीय नेता आज किंवा उद्या सीबीआयसमोर स्वत: हजर होऊ शकतो. मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवण्यासाठी योजना आखण्यात येत आहे".

भाजप नेते सुरेश नाखुआ यांनी आपल्या ट्वीटमध्ये कोणत्याही नेत्याच्या नावाचा उल्लेख केलेला नाहीये. आपल्या ट्वीट बाबत सांगताना सुरेश नाखुआ यांनी टाइम्स नाऊला सांगितले की, "हायप्रोफाईल केस सुरू आहे. सूत्र सांगत आहेत की, एक युवा नेता स्वत:हून सीबीआयसमोर हजर होऊ शकतो आणि आमच्याकडे बोट दाखवले जात आहे पण आपण प्रामाणिक आहोत असं सांगण्याचा प्रयत्न करु शकतो".

सीबीआयची टीम सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत दाखल झाली असून त्यांनी या प्रकरणाशी संबंधित वस्तू, पुरावे आपल्या ताब्यात घेतले आहेत. यामध्ये सुशांतचा ज्युस मग, चादर, बेडशीट, ज्या कपड्याने फास घेतला तो, सीसीटीव्ही फूटेज, सुशांतची डायरी, तीन मोबाइल फोन, सुशांतचा लॅपटॉप या वस्तूंचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी