Sushant Singh: बिहारचे एसपी विनय तिवारींची क्वारंटाईनमधून BMCने केली सुटका

Bihar IPS officer Vinay Tiwari released from quarantine: सुशांतसिंह प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहारहून मुंबईत आलेल्या एसपी विनय तिवारी यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. अखेर त्यांची क्वारंटाईनमधून सुटका केलीय.

Bihar IPS officer Vinay Tiwari
पाटणाचे एसपी विनय तिवारी 

थोडं पण कामाचं

  • पाटणाचे एसपी विनय तिवारी यांची क्वारंटाईनमधून बीएमसीने केली सुटका 
  • सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात तपास करण्यासाठी विनय तिवारी बिहारहून मुंबईत आले होते
  • मुंबई मनपाने विनय तिवारी यांची क्वारंटाईनमधून सुटका केल्यानंतर ते बिहारला रवाना झाले

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहारमधील पाटणा शहराचे पोलीस अधिक्षक विनय तिवारी (SP Vinay Tiwari) मुंबईत आले होते. मुंबईत आल्यावर एसपी विनय तिवारी यांना मुंबई मनपाने (BMC) क्वारंटाईन केलं होतं. अखेर एसपी विनय तिवारी यांची बीएमसीने क्वारंटाईनमधून सुटका केली आहे. पोलीस अधिक्षकांनाच मुंबईत क्वारंटाईन केल्याने चांगलाच वाद निर्माण झाला होता.

सुशांत सिंह राजपूत याच्या वडिलांनी बिहारमधील पाटणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पाटणा पोलिसांचे पथक चौकशीसाठी मुंबईत दाखल झाले होते. सोबतच आयपीएस अधिकारी आणि पाटणाचे एसपी विनय तिवारी हे सुद्धा मुंबईत तपासासाठी पोहोचले. बिहार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास विनय तिवारी यांच्याकडे सोपवला आहे. विनय तिवारी हे मुंबईत आल्यानंतर बीएमसीने त्यांना होम क्वारंटाईन केलं आणि होम क्वारंटाईनचा काळ हा १४ दिवस असल्याने त्यांना तितके दिवस घराबाहेर पडण्यास बीएमसीने मनाई केलेली. या संपूर्ण प्रकरणावरुन चांगलाच वादही निर्माण झाला होता. 

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस बिहार पोलिसांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने ही शिफारस मान्य करत सीबीआयकडे तपास देण्यास मान्यता दिली. यानंतर सीबीआयने सुद्धा तपास हाती घेत ६ ऑगस्ट २०२० रोजी एकूण सहा जणांच्या विरोधात गुन्हा ही दाखल केला आहे.

आता बिहारचे पोलीस अधिक्षक विनय तिवारी यांची मुंबई मनपाने होम क्वारंटाईनमधून सुटका केली आहे. मात्र, यावेळी मुंबई मनपाने काही अटी ठेवल्या आहेत. त्यानुसार बिहारला जात असल्याचं तिकीटही मनपाला दाखवानं लागणार असल्याचं म्हटलं होतं. 

पोलीस अधिक्षक विनय तिवारी यांनी एएनआय न्यूज एजन्सीला प्रतिक्रिया देत म्हटलं, बीएमसीने मला कळवलं आहे की तुम्ही होम क्वारंटाईन सोडून जाऊ शकता. त्यानंतर आता मी पाटण्याला रवाना होत आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी