Viral Audio : ७० सेकंदात शिव्यांचा पाऊस, टीम संजय राऊत कायदेशीर कारवाईच्या विचारात

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 30, 2022 | 17:06 IST

एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये ७० सेकंदात एक व्यक्ती सतत महिलेला शिव्या देत असल्याचे ऐकू येत आहे. क्लिपमधील आवाजावरून चर्चेला उधाण आले आहे, पण आवाज संजय राऊत यांचा नाही, असे संजय राऊत यांच्या टीमचे म्हणणे आहे.

Team Sanjay Rauts claim on Abusive call voice in audio is not of Raut we will take legal action
Viral Audio : ७० सेकंदात शिव्यांचा पाऊस, टीम संजय राऊत कायदेशीर कारवाईच्या विचारात  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • Viral Audio : ७० सेकंदात शिव्यांचा पाऊस, टीम संजय राऊत कायदेशीर कारवाईच्या विचारात
  • जमिनीचे हक्क सुजितच्या किंवा माझ्या नावावर हस्तांतरित (ट्रान्सफर) कर, 'त्या' आवाजाने दिली धमकी
  • पोलीस तपास सुरू

एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये ७० सेकंदात एक व्यक्ती सतत महिलेला शिव्या देत असल्याचे ऐकू येत आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमधील आवाजावरून चर्चेला उधाण आले आहे. या अशा वातावरणात शिवसेनेचे (Shivsena) राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या टीमची पहिली अधिकृत प्रतिक्रिया 'टाइम्स नाउ नवभारत' या वृत्तवाहिनीला मिळाली आहे. 

Mumbai Crime : गोवंडीत लहान मुलांना विषप्रयोग करून दाम्पत्याची आत्महत्या

ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राऊत यांचा नाही, असे संजय राऊत यांच्या टीमचे म्हणणे आहे. पण फोनवर शिव्या ऐकणाऱ्या व्यक्तीने ७० सेकंदात वारंवार शिव्या देणाऱ्या व्यक्तीचे नाव संजय राऊत हेच असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी टीम संजय राऊत कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात आहे. वकिलांचा सल्ला घेऊन कारवाई करणार असल्याचे स्पष्ट संकेत टीम संजय राऊत यांच्याकडून देण्यात आले आहेत. 

व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती महिलेला शिव्या देत आहे. जमिनीचे (स्थावर मालमत्ता) मालकी हक्क सुजितच्या किंवा माझ्या नावावर हस्तांतरित (ट्रान्सफर) कर असे सांगण्यासाठी धमकावत आहे. महिलेने वारंवार धमक्या दिल्या जात असल्याची आणि मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार केली आहे. महिलेने केलेल्या तक्रारीचा मुंबई पोलीस तपास करत आहेत.
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी तपास सुरू असल्याचे सांगितले.

पोलीस तपास सुरू असतानाच टीम संजय राऊत यांनी व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्याचा विचार सुरू केला आहे. वकिलांशी सल्लामसलत करून योग्य ती कारवाई करू असे टीम संजय राऊत सांगत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी