धक्कादायक...उत्तनमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या

मुंबई
Updated Dec 12, 2019 | 12:26 IST

ठाणे जिल्ह्याच्या उत्तनमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. 

seven-year-old girl was raped
उत्तनमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या, मृतदेह पुरला सिमेंटच्या ड्रममध्ये   |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  • ठाणे जिल्ह्याच्या उत्तनमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.
  • एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. 

ठाणे: ठाणे जिल्ह्याच्या उत्तनमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी प्रथम अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली आहे. 

धक्कादायक म्हणजे, आरोपीनं त्याच्या मित्राच्या मदतीनं तिला ड्रमच्या आत पुरलं. नंतर सिमेंटच्या मिश्रणानं तो ड्रम भरला आणि वेगळ्या ठिकाणी निघून त्याची विल्हेवाट लावली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.  त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आरोपीने तिच्यावर पहिले बलात्कार केला आणि तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर, आरोपीने त्याच्या मित्रासोबत मुलीला एका सिमेंटच्या ड्रममध्ये लपवून ठेवलं होतं. या गंभीर प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर भारतीय दंड संहितेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, पीडितेच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या हत्येप्रकरणी, मला न्याय मिळाला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आहे. हैदराबादमध्ये पीडितेवर झालेल्या हत्येप्रकरणी, जसं तेलंगणा पोलिसांनी ४ आरोपींचा एन्काऊंटर केला होता. तशीच कार्यवाही या आरोपींवर झाली पाहिजे, असं मत पीडितेच्या वडिलांनी मीडियासमोर व्यक्त केलं आहे. 

दरम्यान, अशीच एक घटना हैदराबादनंतर, उत्तरप्रदेशमध्ये सुद्धा घडली होती. ४ वर्षाच्या मुलीने आपल्या वडिलांना फुगा घेण्यासाठी हट्ट केला होता. या हट्टापायीच वडिलांनी आपल्या निष्पाप मुलीची क्रूरपणे हत्या केल्याची घटना समोर आली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...