[VIDEO] २१,१६० रुपये किंमतीचे १६८ किलो कांद्यांवर चोरट्यांचा डल्ला, कॅमेऱ्यात कैद झाली चोरी...

मुंबई
Updated Dec 11, 2019 | 14:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

Onion steal : रविवारी चोरांनी हजारो रुपये किंमतीच्या कांद्यांची चोरी केली आहे. मुंबईच्या डोंगरी मार्केटमध्ये दुकानदाराने दुकान उघडले तेव्हा कांद्याची पोती गायब असल्याचे लक्षात आले. 

thieves steal 168 kg of onions from two stores caught on camera crime news in marathi google newsstand
[VIDEO] २१,१६० रुपये किंमतीचे १६८ किलो कांद्यांवर चोरट्यांचा डल्ला, कॅमेऱ्यात कैद झाली चोरी...  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई :  कांद्याचे सतत वाढणारे भाव पाहता कांद्याला सोन्याचे महत्त्व आले आहे. यातच पुन्हा एकदा कांदा चोरीचा प्रकार समोर आला आहे. मुंबईतील डोंगरी भागात असलेल्या मार्केटमध्ये १६८ किलो कांद्याची चोरी झाली. दुकानातून कांद्याची पोती गायब झाल्यानंतर पोलिसांनी दुकानदाराच्या तक्रारीनंतर या प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. याच चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात चोर कांद्याची पोती चोरताना दिसत आहेत.

पोलिसांनी दुकानदाराचा जबाब नोंदविला आहे. मार्केटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक करण्यात आले. घटना रविवारी घडली. यात दोघा दुकानदारांनी आपले दुखान उघडले, त्यावेळी त्यांना कांद्याची काही पोती गायब असल्याचे निदर्शनास आले. यातीत एक दुकानदार अकबर यांनी सांगितले की, त्याच्या १३४४० रुपये किंमतीच्या १२२ किलो कांद्याची चोरी झाली आहे. तर दुसरा दुकानदार इरफान यांनी सांगितले की माझ्या ५६ किलो कांद्याची चोरी झाली आहे. याची किंमत सुमारे ६, ७२० रुपये होती. 

पोलिसांनी लावलेल्या अंदाजानुसार चोरी झालेल्या कांद्याची एकूण किंमत ही २११६० रुपये आहे. सध्या मुंबईत कांद्याची किंमत १२० ते १४० रुपये किलो आहे. कांद्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे कांदा चोरीच्या घटना घडत आहेत. या वर्षी सप्टेंबरमध्ये नाशिकमध्ये १ लाख रुपये किंमतीच्या कांद्याची चोरी झाली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी