'मला तर जेलमध्ये टाकलं, तरीही मी पक्षासोबत', राऊतांचा किर्तीकरांवर घणाघात

मुंबई
Updated Nov 12, 2022 | 17:54 IST

Sanjay Raut Criticized Gajanan Kirtikar: शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

थोडं पण कामाचं
  • संजय राऊतांची गजानन किर्तीकरांवर टीकाही
  • शिंदे गटात प्रवेश केलेल्या किर्तीकरांचा घेतला खरपूस समाचार
  • गजानन किर्तीकर होते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते

Sanjay Raut: मुंबई: शिवसेना खासदार आणि ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले. (though i was put in jail i am still with my party shiv sena sanjay raut attack on gajanan kirtikar)

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

गजानन किर्तीकर हे आमचे ज्येष्ठ सहकारी होते, खरं म्हणजे या वयात पक्षाने त्यांना काय दिलं नाही? पाच वेळा आमदार राहिले. दोन्ही मंत्रिमंडळात ते मंत्री होते. त्यानंतर दोन वेळा त्यांना पक्षातर्फे खासदारकी मिळाली. त्यांचे चिरंजीव जे आहेत अमोल किर्तीकर.. हे कडवट शिवसैनिक हे पक्षाबरोबर आहेत. 

अधिक वाचा: 'उत्तर भारतीय बिल्डरसाठी ठाकरेंना माझं...' किर्तीकर बरसले 


गजानन किर्तीकरांचा हा दुर्दैवी निर्णय म्हणणार नाही. पण किर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात. सर्व काही प्राप्त करुन, भोगून तेव्हा लोकांच्या मनात एक वेगळी भावना निष्ठा या शब्दाविषयी निर्माण होते. फार-फार मोठी अशी सळसळ निर्माण झाली असा काही भाग नाही. 

गेले ठिक आहेत... उद्यापासून लोकं त्यांना विसरुन जातील. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला आता काही अर्थ नाही. आपण गेलात आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत.  

जे गेले आहेत त्यांना पुन्हा निवडून यायचं आहे. परत किती निवडून येतात ते पाहूयात. अंधेरीच्या निवडणुकीत तुम्ही नेमकं काय घडलं ते पाहिलं. 

अधिक वाचा: शिंदे गटात गजानन कीर्तिकरांचा प्रवेश,मुलानंही घेतलाही निर्णय

जर तुमच्यात हिंमत होती तर तुम्ही निवडून हेती तर निवडणूक लढवून दाखवायची होती. आमच्या पक्षाचं चिन्ह गेलं, पक्षाचं नाव गेलं. तरीही 68 हजार लोकांनी शिवसेनेला मतदान केलं आहे. आता मशाल, उद्धव ठाकरे आणि मूळ शिवसेना ही खूप पुढे जाईल. 

गजानन किर्तीकरांचा जो मुलगा आहे तो पक्षाचा महत्त्वाचा कार्यकर्ता आहे. त्याने आपल्या वडिलांना समजविण्याचा प्रयत्नही केला आहे. अमोल किर्तीकर हा शिवसेनेसोबत आहे आणि यापुढेही राहील. 

मला तर पक्षाने जेलमध्ये टाकलं तरीही मी पक्षासोबत आहे. मला तर चुकीच्या पद्धतीने टाकलं तुरुंगात... तरीही मी पक्षासोबत आहे. संकटात जो आपल्या पक्षासोबत राहतो त्याला निष्ठा म्हणतात. राजकारणात अनेकदा काही निर्णय घ्यावे लागतात. ते आम्ही घेतले. 

काल राहुल गांधी आणि आमचे आदित्य ठाकरे हे हातात हात घालून चालत होते.. देश जोडण्यासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी.. यातून देशाला फार मोठा संदेश गेला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी