'असं' म्हणत उद्धव ठाकरेच ठरले खरे बाहुबली

मुंबई
Updated Nov 08, 2019 | 21:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Uddhav Thackeray: शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात सत्ता स्थापनेवरुन सुरु असलेला संघर्ष आणखी वाढला असल्याचं दिसत आहे. दोन्ही पक्षांकडून आथा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात येत आहे. 

uddhav thackeray baahubali movie dailogue cm post promise shiv sena bjp amit shah devendra fadnavis vidhan sabha election 2019 news marathi
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • राज्यातील सत्ता संघर्ष आणखी वाढला
  • शिवसेना आणि भाजपत आरोप प्रत्यारोप 
  • मी भाजपला शत्रुपक्ष मानत नाही फक्त त्यांनी खोटं बोलू नये - उद्धव ठाकरे

मुंबई: राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच आता आणखी वाढल्याचं दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आणि त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, मला एकाच गोष्टीचं दु:ख झालं की, माझ्यावर आणि ठाकरे परिवारावर पहिल्यांदाच कोणीतरी खोटं बोलण्याचा आरोप केला आहे.

शिवसेना-भाजपत काय ठरलं होतं?

लोकसभा निवडणुकीवेळी मी दिल्लीला गेलो नव्हतो अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले तत्पर्वी युती संदर्भात आमची चर्चा झाली हे खरं आहे. ती चर्चा मधल्यावेळेत माझ्यमामुळेच थांबली होती. चर्चा सुरु असताना माझ्यासमोर प्रस्ताव आला की उपमुख्यमंत्रिपद तुम्हाला मिळेल मी म्हटलं उपमुख्यमंत्रिपदासाठी युती करण्यासाठी मी लाचार नाहीये. मी शिवसेना प्रमुखांना वचन दिलं आहे आणि ते वचन म्हणजे 'मी एक ना एक दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेचा माणूस बसवेल हे वचन मी शिवसेना प्रमुखांना दिलं आहे, हे वचन मी पाळणार म्हणजे पाळणारच. त्यसाठी मला अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाची गरज नाही'.

दुसऱ्या दिवशी मला फोन आला काय करायचं मी म्हटलं माझ्या शब्दावर मी ठाम आहे. अमित शहा म्हणाले काय करायचं मी म्हटलं माझ्या वडिलांना मी वचन दिलं आहे. ते म्हणाले ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री... मी म्हटलो मला समसमान पाहिजे जागावाटप आणि सत्तेचा वाटा, मुख्यमंत्रिपद सुद्धा अडीच-अडीच वर्षे पाहिजे. ते म्हणाले ठिक आहे. तेव्हा अमित शहा म्हणाले, अच्छा ठिक आहे आपका सीएम रहेगा तो आप हमे कन्सिडर करो हमारा रहेगा तो हम आपको करेंगे.

मोतोश्रीवर चर्चा झाली होती

मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच आपण भाजप अध्यक्ष अमित शहा आणि नितीन गडकरी यांच्यासोबत सुद्धा बोललो त्यांनी सुद्धा अशा प्रकारे मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटण्याबाबत कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचं सांगितलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप खोटं बोलत असल्याचं सांगितलं. अमित शहा मातोश्रीवर आले असताना शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत बसून चर्चा झाली होती असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

मी भाजपला शत्रुपक्ष मानत नाही फक्त त्यांनी खोटं बोलू नये कारण खोटं बोलण्याची परंपरा ही शिवसेनेची असू शकत नाही. आम्ही मोदींवर टीका केलेली नाही कारण मोदीजी मला दोन वेळा लहान भाऊ म्हणालेले आहेत. हे भावाभावाचं नातं जर का कोणाच्या पोटात दुखत असले तर त्याचा शोध मोदींनी घ्यायला पाहिजे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...