विरोधीपक्ष नेतेपदाच्या खुर्चीवर उद्धव ठाकरेंना बसण्यास सांगताच केलं मोठं विधान, पाहा VIDEO

मुंबई
Updated Aug 23, 2022 | 21:28 IST

Uddhav Thackeray big statement: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधीमंडळात आज दाखल झाले. यावेळी त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. 

Uddhav Thackeray: राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर उद्धव ठाकरे हे प्रथमच विधानभवनाच्या परिसरात आले. महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी उद्धव ठाकरे विधीमंडळात दाखल झाले होते. उद्धव ठाकरे हे अद्यापही विधान परिषदेचे सदस्य असल्याने ते विधिमंडळात येऊ शकतात. विधीमंडळात दाखल झाल्यावर त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना कार्यालयातील विरोधीपक्षनेते पदाच्या खुर्चीवर बसण्यास सांगितले. मात्र, उद्धव ठाकरे हे त्या खुर्चीवर बसले नाहीत आणि म्हणाले, मी विरोधी पक्षाच्या खुर्चीवर कोणाला जास्त वेळ बसू देणार नाही. लवकरच शिफ्टिंग करणा. जास्त वेळ विरोधी पक्षात बसा असं मी सांगणारच नाही.

अंबादास दानवे यांना विधानभवनातील विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर खूप दिवस बसू द्यायचे नाही, असे सूचक वक्तव्य शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्काला उधाण आले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी