Uddhav Thackeray : संजय राऊत यांना एखाद्या प्रकरणात गोवून पुन्हा अटक करतील, उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली शंका

मुंबई
Updated Nov 10, 2022 | 16:02 IST

 Uddhav Thackeray :सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जामिनीवर सुटका झाली. तसेच राऊत यांना बेकायदेशीर अटक करत कोर्टाने ईडीवर ताशेरेही ओढले. आज राऊत उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री येथे उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.

थोडं पण कामाचं
  • सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जामिनीवर सुटका झाली.
  • तसेच राऊत यांना बेकायदेशीर अटक करत कोर्टाने ईडीवर ताशेरेही ओढले.
  • आज राऊत उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री येथे उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.

Uddhav Thackeray : मुंबई : सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जामिनीवर सुटका केली. तसेच राऊत यांना बेकायदेशीर अटक करत कोर्टाने ईडीवर ताशेरेही ओढले. आज राऊत उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री येथे उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. संजय राऊत हे आपल्या परिवारातीलच आहेत, परंतु एखाद्या प्रकरणात त्यांना गोवून त्यांना पुन्हा अटक केली जाईल अशी शंका उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच केंद्रीय यंत्रणा कशा प्रकारे केंद्र सरकारच्या पाळीव झाल्या आहेत अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

अधिक वाचा : Bharat Jodo Yatra 'भारत जोडो' यात्रेमध्ये देशमुख बंधू गैरहजर, प्रकाश आंबेडकरांचे भाकीत खरे ठरणार?

उद्धव ठाकरे म्हणाले की, संजय राऊत माझे चांगले मित्र, जो संकटाच्या काळातही न डगमगता सोबत राहतो तो खरा मित्र. केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत. ज्यांच्य मागे धावायला सांगितले त्यांच्या मागे धावत जात आहेत.  न्यायदान यंत्रणाही आपल्या ताब्यात घेतल्या जाणार आहेत की काय असे वक्तव्य केंद्रीय मंत्री किरेण रिजुजी यांनी केले आहे. न्यायालयात सर्वसामान्यांना न्याय मिळतो आता त्यावरही केंद्रीय मंत्री वक्त्यव्य करत आहेत तर तो ही गुन्हा ठरतो. यावरही न्यायदेवता दखल घेतील. राऊ यांच्यासाठी तुरुंगातील काळ हा खडतर होता, तो काळ आमच्यासाठीही खडतर होता. राऊत आणि मी एकाच कुटुंबातील आहोत. या संकटकाळात राऊत आमच्यासोबत उभे होते. राऊत फक्त उभे नव्हते तर लढतही होते. संजय राऊत यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली होती. आता आगामी काळातही त्यांना एखाद्या प्रकरणात गोवून अटक केली जाईल अशी शंका ठाकरे यांनी व्यक्त केली.  

अधिक वाचा :  संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यावर रोहित पवारांकडून 'वाघा'चा जबरदस्त व्हिडिओ ट्विट 

दोन पुस्तकं प्रकाशित करणार

मी १०० दिवस्त तुरुंगात होतो, परंतु मी विचार करत होतो सावरकर कसे राहिले असतील, टिळक एवढे वर्षे कसे काय तुरुंगात राहिले असतील, आणिबाणीच्या काळात अनेक नेते तुरुंगात राहिले होते ते कसे राहिले असतील असा विचार केल्याचे संजय राऊत म्हणाले. मी  सुध्दा युद्ध कैदी होतो. या काळात मी खूप वाचन केले. मी लिहिणारा माणूस आहे. अनेक बातम्या मी वाचत होतो, अनेक पुस्तकं वाचली, त्याची टिपणं मी काढली असून लवकच यावर मी दोन पुस्तकं लिहिणार असल्याचे राऊत यांनी नमूद केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी