Uddhav Thackeray: "शिरूरमधील काही माणसं 'ढळली' पण खरी 'अढळ' माणसं माझ्यासोबत"

मुंबई
Updated Sep 29, 2022 | 15:02 IST

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष सुरू झाला आहे. याच दरम्यान दोन्ही बाजुकडून एकमेकांवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. 

Uddhav Thackeray on Shivajirao Adhalrao Patil: एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील नेते, नगरसेवक, आमदार, खासदार हे शिंदे गटात सहभागी होत आहेत. त्याच दरम्यान शिंदे गटाने थेट शिवसेनेवर दावा केला आणि त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष आणखी वाढला. यावरुन आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात सहभागी झालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. (Uddhav Thackeray taunts on shivajirao adhalrao patil watch video) 

शिरूर मतदारसंघातील काही लोकं 'ढळली' पण खरी 'अढळ' माणसं माझ्यासोबत आहेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आढळराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, शिरूर मतदारसंघात शिवनेरी किल्ला आहे आणि या मतदारसंघात गद्दार माणसे आढळली नाही पाहिजेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी