कोर्टात सुनावणी सुरु असताना उद्धव ठाकरेंनी दिला आदेश, म्हणाले “ महापालिका जिंकायचीय, तयारीला लागा…”

shivsena : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीबाहेर त्र्यंबकेश्वर, नाशिक येथील शिवसैनिकांशी संवाद साधला.

Uddhav Thackeray's interaction with Shiv Sainiks outside Matoshree while the hearing is going on in the High Court.
कोर्टात सुनावणी सुरु असताना उद्धव ठाकरेंनी दिला आदेश, म्हणाले “ महापालिका जिंकायचीय, तयारीला लागा…” 
थोडं पण कामाचं
  • हायकोर्टाकडून दसरा मेळावासाठी उद्धव ठाकरे यांना परवानगी
  • उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधला
  • कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळावासाठी मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या गटाला शिवाजी पार्कवर परवानगी दिली आहे. दरम्यान, कोर्टात सुनावणी सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज त्र्यंबकेश्वरमधील शिवसैनिकांशी संवाद साधला. (Uddhav Thackeray's interaction with Shiv Sainiks outside Matoshree while the hearing is going on in the High Court.)

अधिक वाचा : Dasara Melava : शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेला मुंबई उच्च न्यायालयाकडून परवानगी, शिंदे गटाला मोठा धक्का 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवसैनिक मातोश्रीवर आले होते. उद्धव ठाकरेंनी यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधत आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश दिला. तसंच निवडणुकीच्या तोंडावर रुसवे, फुगवे, गट पडू देऊ नका असा सल्लाही दिला.

उद्धव ठाकरेंसमोर कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणा देत आपण सोबत असल्याची हमी दिली. त्यांच्याशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी मी लवकरच नाशिकला येणार आहे. तिथे गर्दीचा रेकॉर्ड मोडणारा मेळावा घेऊ असा निर्धार केला.

पुढे ते म्हणाले “उत्साह अमाप आहे, पण एकजुटही तशीच ठेवा. आपल्याला प्रत्येक महापालिका जिंकायचीच आहे, शिवसेनेचा भगवा फडकावयचाच आहे. निवडणूक आल्यावर रुसवे, फुगवे, गट पडणं अशा गोष्टी होऊ देऊ नका. उमेदवारी फार माोजक्या लोकांना देता येते. पण आपल्यासाठी भगवा झेंडा हाच आपला उमेदवार आहे. त्यामुळे तयारीला लागा”.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी