UP Election 2022 : उत्तर प्रदेश निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची युती, पवार स्वतः प्रचार करणार

मुंबई
Updated Jan 11, 2022 | 19:09 IST

UP Election 2022 sharad pawar उत्तर प्रदेश निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. तसेच गोव्यातही तृणमूलसोबत चर्चा सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.

थोडं पण कामाचं
  • उत्तर प्रदेश निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे.
  • गोव्यातही तृणमूलसोबत चर्चा सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.

UP Election 2022 : मुंबई : उत्तर प्रदेश निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. तसेच गोव्यातही तृणमूलसोबत चर्चा सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले. मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (up 2022 election ncp and samajawadi party alliance sharad pawar press conference)

पवार म्हणाले की, “उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षासोबत आणि इतर छोट्या पक्षांसोबत निवडणुक लढवणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन सपाच्या नेत्यांची आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली.” अनेक सहकार्‍यांशी चर्चा झाल्यानंतर उत्तर प्रदेशन परिस्थिती बिकट आहे असे असे कळाले असे पवार म्हणाले. 

उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन आणण्यासाठी काही पक्षांना एकत्र आणून एक चांगला पर्यात निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.आज सिराज मेहंदी यांनी राष्ट्रवादीमधे प्रवेश घेतला आहे. आज उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याने राजीनामा दिला आहे. काही दिवसांत अनेक आमदार समाजवादी पक्षात सामील होतील असेही पवार म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये ध्रुवीकरण

उत्तर प्रदेशमध्ये जनतेला परिवर्तन हवंय असे पवार म्हणाले. तसेच सध्या जनतेच भाजपवर विश्वास उरलेला नाही. ज्या पक्षांकडे साधनसामुग्री आहे, आर्थिक ताकत आहे असे लोक इतर माध्यमं वापरून निवडणुकीत प्रचार करत आहेत. यावर आपण फार बोलणार नाही असे पवार म्हणाले. तसेच उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक ध्रुवीकरण सुरू आहे अशी टीका पवार यांनी केली. अयोध्येप्रकरणी न्यायालयाने निर्णय दिला आहे आणि तो आम्ही स्विकारल आहे. त्यानंतर जाणूनबुजून दुसरे मुद्दे उपस्थित करून धार्मिक ध्रुवीरकरण केले जात आहे, जनता याचे प्रत्युत्तर देईल असे पवार म्हणाले.  


योगींवर टीका

शरद पवार यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ८०-२० फॉर्म्युलाचा उल्लेख केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की ८० टक्के लोक आमच्यासोबत आहेत २० टक्के नाही. मला विचारायचे आहे की हे २० टक्के कोण? जो मुख्यमंत्री असतो तो अशा प्रकारचे वक्तव्य नाही करू शकत. सगळे त्यांचे असतात. २० टक्के लोक आमचे नाहीत हे एका मुख्यमंत्र्याला बोलेणे शोभत नाही, परंतु यांची विचारसरणीच अशी आहे म्हणून त्यांनी असे विधान केले आहे. उत्तर प्रदेशची जनता याचे योग्य प्रत्युत्तर देईल असेही पवार म्हणाले. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी