Breaking News : सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून शिवसेनेला पहिला प्रस्ताव 

मुंबई
Updated Oct 30, 2019 | 15:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला पहिला प्रस्ताव दिला आहे. या पहिल्या प्रस्तावानुसार १३/२६चा फॉर्म्युला दिला आहे.

vidhansabha election 2019 bjp send first proposal to shiv sena for government formation news in marathi
सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून शिवसेनेला पहिला प्रस्ताव   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • भाजपकडून चर्चा सुरू करण्यासाठी शिवसेनेला पहिला प्रस्ताव
 • गेल्या सरकारपेक्षा फक्त एक मंत्रिपद वाढवून दिले
 • उपमुख्यमंत्रीपद सोडण्यास भाजपची तयारी - सूत्र

मुंबई : पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला पहिला प्रस्ताव दिला आहे. या पहिल्या प्रस्तावानुसार १३/२६चा फॉर्म्युला दिला आहे. त्यानुसार शिवसेनेला १३ मंत्रीपद आणि २६ मंत्रीपद भाजपला अशी ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे. यात भाजपने मुख्यमंत्रीपद, महसूल, वित्त, कृषी, गृह आणि विधानसभा अध्यक्षपद सोडून बोलणी करता येईल असेही या प्रस्तावात म्हटले आहे. 

भाजपने शिवसेनेला या प्रस्तावात उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी दर्शवली असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. गेल्या सरकारमध्ये शिवसेनेला १२ मंत्रीपदे देण्यात आली होती. पण आता त्यात फक्त एका मंत्रीपदाची वाढ करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यात कॅबिनेट मंत्रीपदे किती आणि राज्यमंत्रीपदे किती याचा तपशील अद्याप आलेला नाही. त्यामुळे हा प्रस्ताव शिवसेना मान्य करेल अशी शक्यता फार कमी आहे. 

दरम्यान, गेल्या सरकारमध्ये अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार झाला होता. त्यावेळी भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊ केले होते. पण अत्यंत कमी काळासाठी असलेले हे पद घेण्यास शिवसेनेने नकार दिला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर काही नवी नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दरम्यान, या १३ मंत्रीपदांच्या आकड्यात किती कॅबिनेट आणि तेही किती महत्त्वाचे भाजप देणार यावर सर्व गणिते ठरू शकणार आहे. 

वाटाघाटीची चर्चा पुढे सरकावी यासाठी भाजपने सुरूवातीला हा १३/२६ चा फॉर्म्युला समोर ठेवला आहे. त्यानंतर त्यावर चर्चा होऊन दोघांना मान्य होईल अशी स्थिती निर्माण झाल्यावरच सत्तेत शिवसेना सहभागी होणार की नाही हे ठरणार आहे. 

भाजपने हे खाते देण्यास दिला नकार 

 1. मुख्यमंत्री

 2. महसूल मंत्री

 3. वित्त मंत्री, 

 4. गृहमंत्री

 5. कृषीमंत्री 

 6. विधानसभा अध्यक्षपद 

 

निवडणुकीनंतर पक्षीय बलाबल

 1. भाजप - १०५ 
 2. शिवसेना - ५६ 
 3. राष्ट्रवादी - ५४ 
 4. काँग्रेस - ४४ 
 5. इतर - १३ 
 6. बहुजन विकास आघाडी - ३ 
 7. एमआयएम - २ 
 8. समाजवादी पक्ष - २ 
 9. प्रहार जनशक्ती पक्ष - २ 
 10. मनसे - १ 
 11. स्वाभिमानी पक्ष - १ 
 12. सीपीआय - १ 
 13. जन सुराज्य शक्ती - १ 
 14. क्रांतिकारी शेतकरी पक्ष - १
 15. शेकाप - १ 
 16. राष्ट्रीय समाज पक्ष - १ 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...