vidya chavan vs Chitra Wagh । चित्राताई तुम्ही धुतल्या तांदळासारख्या नाहीत, आमच्याकडेही अनेक गोष्टी : विद्या चव्हाणांचा इशारा 

मुंबई
Updated Jul 22, 2022 | 18:50 IST

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ ट्विट करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole ) यांना प्रश्न विचारला होता तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (vidya chavan) यांना छळ करणारी सासू म्हटले होते.

थोडं पण कामाचं
  • भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ ट्विट करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole ) यांना प्रश्न विचारला होता
  • तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (vidya chavan) यांना छळ करणारी सासू म्हटले होते.
  • आज विद्या चव्हाण यांनी जोरदार हल्ला केला आहे.

मुंबई :  भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ ट्विट करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole ) यांना प्रश्न विचारला होता तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (vidya chavan) यांना छळ करणारी सासू म्हटले होते. त्यावर आज विद्या चव्हाण यांनी जोरदार हल्ला केला आहे. लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा तुम्हांला अधिकार नाही. तुम्ही धुतल्या तांदळासारख्या नाहीत. आमच्याकडेही अनेक गोष्टी आहेत. त्या आम्हांला बाहेर काढायला लावू नका. तुम्ही हे थांबविले नाही तर आम्ही त्या गोष्टी बाहेर काढू असा इशाराच विद्या चव्हाण यांनी दिला आहे.  

अधिक वाचा :  नारळपाणी पिण्याचे फायदे

आत्तापर्यंत भरपूर पत्रकार परिषद झाल्या. त्यामध्ये माजी मंत्री संजय  राठोड असतील मेहबूब शेख असतील किंवा आत्ताची नाना पटोले असतील चित्रा वाघ यांनी पुरूषांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.  एखादी स्त्री आणि पुरुष एकमेकांना संमतीने भेटत असतील तर याविषयी यांनी असं जाहीर पणे बोलणं चुकीचं आहेत असे विद्या चव्हाण यांनी या वेळी सांगितले. 

अधिक वाचा : ऑफिसमधल्या या सवयींमुळे वाढू शकतं वजन

संजय राठोड यांच्यावर आरोप करणाऱ्या चित्रा वाघ आता राठोड यांनी भाजपसोबत आल्यावर विद्या चव्हाण यांनी टोमणा मारला आहे. तुमच्या पक्षात आले की सगळे पवित्र होतात आणि बाकीच्या पक्षांना टार्गेट करण्यासाठी प्रेस घेऊन अशा प्रकारे बोलणं बिलकुल बरोबर नाही आहे.  चित्रा वाघ यांनी भान राखाव. चित्रा ताई यांना भान राहिला नाही. चित्रा ताई बेचेन झाल्या आहेत कारण की भाजपाकडून काही तरी मिळावं. कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकवण्याच त्यांना अधिकार नाही. तुम्ही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहे का? तु कोणत्याही पुरुषावर आरोप करता,  असं राष्ट्रवादी काँग्रेस महीला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी