राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये होणार अनलॉक, पण...

मुंबई
Updated Jun 03, 2021 | 21:54 IST

कोरोना संकटाची तीव्रता कमी होऊ लागल्यामुळे महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांमध्ये अनलॉक होणार आहे. पण यात एक मोठी मेख आहे.

थोडं पण कामाचं

  • राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये होणार अनलॉक, पण...
  • राज्यात ५ टप्प्यांमध्ये अनलॉक होणार
  • जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये विभागणी

मुंबईः कोरोना संकटाची तीव्रता कमी होऊ लागल्यामुळे महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांमध्ये अनलॉक होणार आहे. पण यात एक मोठी मेख आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या दोन प्रमुख निकषांआधारे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातल्या स्थितीचा दर आठवड्याला आढावा घेतला जाईल. हा आढावा घेतल्यानंतर संबंधित जिल्ह्यात किती प्रमाणात अनलॉक करायचे हा निर्णय होणार आहे. ही प्रक्रिया नेमकी कधी पासून सुरू होणार हे जाहीर झालेले नाही. (Vijay Vadettiwar announced conditional unlock in maharashtra) 

राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये कोरोना संकटाची तीव्रता कमी होऊ लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामुळेच या जिल्ह्यांमध्ये लवकरच अनलॉक होण्याची शक्यता आहे. पण दर आठवड्याला कोरोना स्थितीचा आढावा घेऊनच अनलॉक किती प्रमाणात करायचे याचा निर्णय होणार आहे; असे महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री (Minister of State for Relief and Rehabilitation ) विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी सांगितले. 

“पूर्ण अनलॉक लागू होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, सायकलिंक ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, खासगी कार्यालये, सरकारी कार्यालयांना १०० टक्के मुभा, क्रीडांगणे आणि थिएटर्सला परवानगी असेल. शूटिंगला देखील परवानगी असेल. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी असेल. लग्नसोहळ्यांना देखील १०० टक्के उपस्थितीची परवानगी असेल”, असे वडेट्टीवार म्हणाले. अद्याप अनलॉक लागू झालेले नाही. या संदर्भात दर आठवड्याला आढावा घेऊनच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अनलॉकचे एकूण पाच स्तर कोणते?

  1. पहिला स्तर - पूर्णपणे अनलॉक
  2. दुसरा स्तर  - मर्यादित स्वरुपात अनलॉक
  3. तिसरा स्तर - निर्बंधासह अनलॉक
  4. चौथा स्तर - निर्बंध कायम
  5. पाचवा स्तर  - रेड झोन, पूर्णपणे लॉकडाऊन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी