Eknath Shinde Speech: अर्ध्या खुर्च्या रिकाम्या तरी मुख्यमंत्री शिंदेंचं भाषण सुरू!

मुंबई
Updated Oct 06, 2022 | 00:18 IST

Eknath Shinde Dasaras Melava Speech: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरु असतानाच अनेकांनी मैदान सोडून जाणं पसंत केलं. ज्याचा व्हीडिओ आता समोर आला आहे.

Eknath Shinde Dasaras Melava मुंबई: राज्यात तीन महिन्यांपूर्वी प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ झाली. ज्यानंतर खरी शिवसेना कोणाची यासाठी ठाकरे आणि शिंदे गटात प्रत्येक गोष्टीसाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. असं असताना दसरा मेळाव्यावरुन देखील दोन्ही गट आमनेसामने आले होते. अखेर हायकोर्टाच्या निर्णयावरुन ठाकरे गटाला शिवाजी पार्क मिळालं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरील मैदानात आपला मेळावा आयोजित केला होता. (while chief minister shindes speech was going on many people left ground bkc mumbai dasara melava shiv sena)

खरं तर या दसरा मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती. पण मुख्यमंत्री शिंदेंचं भाषण लांबताच अनेक जणांनी मैदान सोडण्यास सुरुवात केली. ज्याचे व्हिडीओ आता समोर आले आहेत. हे व्हिडीओ आता सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता शिंदे गट याबाबत काय स्पष्टीकरण देणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

एकनाथ शिंदे यांचं भाषण फार काही प्रभावी झालं नसल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून मिळत आहे. अशावेळी आता मैदानात देखील खुर्चा रिकाम्या असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे आता या सगळ्यावर ठाकरे गट कशाप्रकारे प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी