Ameya Khopkar : हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी देश सोडून जावे, मनसे नेते अमेय खोपकर आपल्या विधानावर ठाम 

मुंबई
Updated Oct 26, 2022 | 16:14 IST

Ameya Khopkar : जर हिंदूच्या सणांचा त्रास होत असेल तर हिंदूद्वेष्ट्या मुस्लिमांनी मुंबईच नव्हे तर देश सोडून जावे असे वादग्रस्त विधान मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी केले होते. या विधानावर त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. परंतु आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

थोडं पण कामाचं
  • जर हिंदूच्या सणांचा त्रास होत असेल तर हिंदूद्वेष्ट्या मुस्लिमांनी मुंबईच नव्हे तर देश सोडून जावे
  • असे वादग्रस्त विधान मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी केले होते.
  • आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

Ameya Khopkar : मुंबई : जर हिंदूच्या सणांचा त्रास होत असेल तर हिंदूद्वेष्ट्या मुस्लिमांनी मुंबईच नव्हे तर देश सोडून जावे असे वादग्रस्त विधान मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी केले होते. या विधानावर त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. परंतु आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. त्यांच्या या विधानवर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी टीका केली होती, त्यावर किशोरी पेडणेकर यांनी सुषमा अंधारे डोईजड होत आहेत तिथे लक्ष द्यावे असा टोला खोपकर यांनी लगावल आहे. (who against firecrackers in diwali should leave india says mns leader ameya khopkar)

अधिक वाचा : Accident News कार-ट्रकचा भीषण अपघात, मुंबईतील कुटुंबासाठी दिवाळी ठरली काळी

मनसे नेते अमेय खोपकर यांनी घेतलेल्या  पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, एका सलमान खान नावाच्या हिंदूद्वेष्ट्या व्यक्तीने रात्रभर फटाके वाजवल्याबद्दल तक्रार केली आहे. अशा लोकांनी इथून चालते व्हावे. भारतात हिंदूचे सण साजरे होणारच. मला सोशल मीडियावर टीका करणारे आणि शिव्या घालणारे हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. किशोरी पेडणेकर यांना आता फटाक्याचा त्रास होत आहे, त्यांना आतापर्यंत भोंग्याचा त्रास होत नव्हता का असा सवाल खोपकर यांनी केला आहे. तसेच शिवसेनेला एमआयएमसोबत युती करायची असेल त्यामुळेच त्या मनसेवर टीका करत असतील. दिवाळी कशी साजरी होत आहे हे पहायचे असेल तर शिवाजी पार्कवर यावे. देशात हिंदूचे सण साजरे होणारच या विधानाचा पुनरुच्चारही खोपकर यांनी केला. 

अधिक वाचा :  Achalpur News : धार्मिक स्थळासमोर फटाके फोडल्याने दोन गटात मोठा तणाव

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी