Vaccination in Maharashtra : राज्यातील लसीकरण घटतंय ही चिंताजनक बाब, केंद्राकडून ज्यादा लसी मागणार, आरोयमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई
Updated Jan 12, 2022 | 21:54 IST

Vaccination in Maharashtra राज्यात आज जरी ४६ हजार रुग्ण आढळले असले तरी दिलासायदाक गोष्ट म्हणजे ८६ टक्के रुग्ण हे होम क्वारंटाईन आहेत. या रुग्णांना कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत, उर्वरित १४ टक्के रुग्णांपैकी  १ टक्क्यांहूनही कमी रुग्ण आयसीयूत आहेत.

थोडं पण कामाचं
  • ८६ टक्के रुग्ण हे होम क्वारंटाईन
  • १४ टक्के रुग्णांपैकी  १ टक्क्यांहूनही कमी रुग्ण आयसीयूत
  • राज्यात जरी कोरोनाचे रुग्ण वाढत असली तरी परिस्थिती चिंताजनक नाही

Vaccination in Maharashtra : राज्यात आज जरी ४६ हजार रुग्ण आढळले असले तरी दिलासायदाक गोष्ट म्हणजे ८६ टक्के रुग्ण हे होम क्वारंटाईन आहेत. या रुग्णांना कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत, उर्वरित १४ टक्के रुग्णांपैकी  १ टक्क्यांहूनही कमी रुग्ण आयसीयूत आहेत. ०.३२ टक्के रुग्ण हे व्हेंटिलेटर आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि आयसीयूत असलेल्या रुग्णांची संख्या ही०.५९ टक्के इतकी आहे. ऑक्सिजन बेडवर रुग्णांची संख्या १.८९ टक्के इतकी आहे. राज्यात जरी कोरोनाचे रुग्ण वाढत असली तरी परिस्थिती चिंताजनक नाही असे टोपे म्हणाले. 

राज्यातील शाळा आणखी १५-२० दिवस बंद राहतील, जानेवारी अखेर आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचे रुग्ण कमी होतील आणि नियमांचे निर्बंध कमी होतील असेही टोपे म्हणाले. राज्यातील लसीकरण घटतय ही बाब चिंताजनक आहे, कोव्हिशील्डची ६० लाख कोव्हॅक्सिसन ४० लाख डोसची केंद्राकडे मागणी करणार असेही टोपे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी