Bachchu Kadu : रवी राणामुळे आपण सरकारवर नाराज, आमदार बच्चू कडू यांचा आंदोलनाचा इशारा

मुंबई
Updated Oct 31, 2022 | 19:26 IST

Bachchu Kadu : राज्य सरकार रवी राणांवर एवढे का फिदा आहेत हे बघावे लागेल असे विधान प्रहार जनशक्ती पक्षाचे आणि शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. तसेच राणा यांनी माफी न मागितल्यास १ नोव्हेंबरला आंदोलन करू असा इशाराही कडू यांनी दिली.

थोडं पण कामाचं
  • राज्य सरकार रवी राणांवर एवढे का फिदा आहेत हे बघावे लागेल
  • असे विधान प्रहार जनशक्ती पक्षाचे आणि शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी केले आहे.
  • तसेच राणा यांनी माफी न मागितल्यास १ नोव्हेंबरला आंदोलन करू असा इशाराही कडू यांनी दिली.

Bachchu Kadu : मुंबई : राज्य सरकार रवी राणांवर एवढे का फिदा आहेत हे बघावे लागेल असे विधान प्रहार जनशक्ती पक्षाचे आणि शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. तसेच राणा यांनी माफी न मागितल्यास १ नोव्हेंबरला आंदोलन करू असा इशाराही कडू यांनी दिली. शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात बैठक झाली. बैठकीला जाण्यापूर्वी कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (will protest if ravi rana dosent apologized say mla Bachchu Kadu in mumbai before meeting with ekanath shinde and devendra fadanvis)

अधिक वाचा :   कार्यकर्त्यांच्या भावना आरपारच्या, एकदाचं काय ते तोडफोड करून बाहेर पडा: बच्चू कडू

आमदार बच्चू कडू म्हणाले की रवी राणा यांनी केलेले आरोप चुकीचे आहे, त्यांनी केलेले आरोप फक्त आमदारांवर नसून सत्ताधारी पक्षावर आहेत. यावर रवी राणा यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे. तसेच राणा यांनी माफीही मागितली पाहिजे. यासाठी मी मुख्यामंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली आहे. राणा यांच्यामुळे फक्त आमदारच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील आमदारही बदनाम होत आहे. यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. आज आपण बैठकीत याच मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. जर रवी राणा यांनी स्पष्टीकरण देऊन माफी नाही मागितली तर आपण १ नोव्हेंबरला आंदोलन करू असा इशारा कडू यांनी दिली आहे. पत्रकारांनी रवी राणा यांना सरकार पाठीशी का घालत आहे अशी विचारणा केल्यावर काय माहित सरकार राणांवर एवढे फिदा का आहेत अशी प्रतिक्रिया कडू यांनी दिली.

अधिक वाचा :  मोठी बातमी ! मविआ नेत्यांची सुरक्षा शिंदे सरकारने काढली तर मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी