Self kidnapping : क्राईम शो पाहून 10 वर्षांच्या मुलाने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून उडाली घरच्यांची झोप

त्याला शाळा चुकवायची होती. तो घरातून बाहेर पडला, मात्र शाळेत गेलाच नाही. घरी आल्यावर त्याने आईवडिलांना एक खोटी घटना घडल्याचं सांगितलं.

Self kidnapping
क्राईम शो पाहून 10 वर्षांच्या मुलाने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शाळा चुकवण्यासाठी रचला अपहरणाचा बनाव
  • 10 वर्षांच्या मुलाला क्राईम सीरियल पाहून सुचली कल्पना
  • आईवडिलांना बसला जबर धक्का

Self Kidnapping : शाळेला (School) जाण्याचा कंटाळा (Bored) आला म्हणून त्याने शाळेला दांडी (absent) मारली. घरातून शाळेला जाण्यासाठी तो बाहेर तर पडला, मात्र शाळेत पोहोचलाच नाही. शाळेचा होमवर्क पूर्ण नसल्यामुळे आता आपल्याला शिक्षा मिळेल, या भितीेने त्याने शाळेला न जाण्याचा निर्णय घेतला आणि दिवसभर बाहेर टाईमपास करत राहिला. शाळेची वेळ संपल्यावर त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला. आपण शाळेत गेलो आणि शाळेतूनच परत आलो, असं दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र शाळेत आपण गैरहजर होतो, ही बाब आपल्या घरच्यांना शाळेकडून कळवण्यात आली असेल, असा संशय त्याच्या मनात आला. त्यामुळे त्याने स्वतःच्या अपहरणाचा बनाव (Fake kidnapping) रचण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूरमध्ये (Chandrapur) घडलेल्या या घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. 

आईवडिलांना मारली थाप

आपण शाळेत जात असताना एका गाडीवाल्यानं आपल्याला किडनॅप केलं, असं त्याने घरी येऊन आईवडिलांना सांगितलं. आपण नेहमीच्या रस्त्याने शाळेत जात असताना एक गाडीवाला तिथे आला. त्याने आपल्याला ओढून त्याच्या गाडीत बसवलं आणि गाडीचं दार लावून वेगाने तो आपल्याला कुठेतरी घेऊन चालला होता. मात्र आपण एका क्षणी त्याचं लक्ष नसल्याचं पाहून सुटका करून घेतली आणि तिथून पळून घरी आलो, असं त्याने आईवडिलांना सांगितलं. हे ऐकून आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली, त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली आणि आपल्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची तक्रार नोंदवली. 

अधिक वाचा - Infant buried : जमिनीतून अचानक बाहेर आला एक हात, आतमध्ये होतं जिवंत नवजात बाळ

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी मुलाने सांगितलेला गाडी नंबर आणि ड्रायव्हरचं वर्णन यावरून अपहरणकर्त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र अर्थातच, या दोन्ही काल्पनिक असल्यामुळे त्या वर्णनाची गाडी किंवा व्यक्ती पोलिसांना सापडण्याची शक्यताच नव्हती. पोलिसांनी उपलब्ध होणारं सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासलं मात्र त्याबाबत कुठलाही पुरावा पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यानंतर पोलिसांना मुलाने केलेल्या वर्णनावर संशय आला आणि त्यांनी पुन्हा एकदा मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला. 

अधिक वाचा -Fire in Night Club: थायलंडमध्ये मोठी दुर्घटना, नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू

मुलाने सांगितलं सत्य

पोलिसांनी गोड बोलून मुलाकडून सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करताच त्याने खरी परिस्थिती सांगून टाकली. आपल्याला शाळेत जाण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्या दिवशी आपण शाळेला दांडी मारली. घरातून दप्तर घेऊन आपण बाहेर तर पडलो, मात्र शाळेत गेलोच नाही. शाळेकडून ही बाब घरी समजली तर मला शिक्षा होईल, या भितीने आपण हा बनाव रचल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. टीव्हीवरील क्राईम मालिका पाहून आपल्याला ही कल्पना सुचल्याचंही त्याने सर्वांना सांगितलं. 

अर्थात, मुलाच्या खोटं बोलण्याचा त्याच्या आईवडिलांना राग आला. मात्र आपल्या मुलाचं प्रत्यक्षात कुणीही अपहरण करण्याचा प्रयत्न केला नव्हता, हे समजल्यानंतर त्यांच्याही जिवात जीव आला. मुलाला पुन्हा असले प्रकार केले तर कडक शिक्षा करण्याची समज पोलिसांनी दिली आहे. या घटनेची सध्या चंद्रपूर भागात जोरदार चर्चा रंगते आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी