Akola Accident News: धक्कादायक! आरती सुरू असताना मंदिरावर कोसळलं 100 वर्षे जुनं झाड, 7 जणांचा मृत्यू

नागपूर
भरत जाधव
Updated Apr 10, 2023 | 11:05 IST

Akola Accident News: अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असताना 100 वर्ष झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत सातजण ठार झाले आहेत. या दुर्घटनेत 30 ते 35 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

100-year-old tree fell while Aarti was going on in the temple, 7 people died
मंदिरावर कोसळलं 100 वर्ष जुनं झाड, 7 जणांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मंदिरालाच लागून असलेलं 100 वर्ष जुनं लिंबाचं झाड मंदिराच्या टिन शेडवर कोसळलं.
  • 100 वर्ष झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत सातजण ठार झाले .
  • बाबूजी महाराज मंदिरात काल रात्री आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Maharashtra Akola Accident News:   अकोला जिल्ह्यातील (Akola News) पारस गावात मंदिरावर लिंबाचं झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला, तर 30 ते 35 जण जखमी झाले आहेत. बाबूजी महाराज मंदिरात रविवारी रात्री ही दुर्घटना घडली. यावेळी पारस गावात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. रविवारी रात्री 9 च्या सुमारास मंदिरात आरती सुरू असताना 50 ते 60 भाविक उपस्थित होते. अचानक ढगांच्या गडगटासह वादळी वारा सुरू झाला. त्यातच 100 वर्षे जुनं झाड मंदिरावर कोसळलं. त्याखाली दबून 7 जणांचा मृत्यू झाला.  ( 100-year-old tree fell while Aarti was going on in the temple, 7 people died, 35 people were injured)

अधिक वाचा  : अंबानीच्या पार्टीमध्ये या तारकांचे कपडे होते चमचम करणारे

विदर्भसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. अशातच अकोला जिल्ह्यातील पारस येथे भलं मोठं झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा बळी गेला आहे. रात्रभर पाऊस सुरू असल्यानं आणि बत्ती गूल झाल्याने मदतकार्यात प्रचंड अडथळे येत होते. तरीही प्रशासन आणि गावकऱ्यांकडून शक्य तितक्या वेगाने मदतकार्य करण्यात आलं. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यातील पारस काल (रविवारी) संध्याकाळी चांगलंच हादरलं. गावातील बाबूजी महाराज मंदिरात रविवारी लगतच्या जिल्ह्यांसह राज्यातून भाविकांची मोठी गर्दी असते.  बाबूजी महाराज मंदिरात काल रात्री आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं.

अधिक वाचा  : काही खाता बरोबर पोट फुगतं, ही गोष्ट खा मिळेल आराम

दररोज होणाऱ्या या आरतीला ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. आरती सुरू असतानाच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मंदिराबाहेर आरतीसाठी उभे असलेले भाविक मंदिरात आले. सर्वजण मंदिरात दाटीवाटीने उभे राहून आरती करत होते. इतक्यात मंदिरालाच लागून असलेलं 100 वर्ष जुनं लिंबाचं झाड मंदिराच्या टिन शेडवर कोसळलं. अचानक झाड कोसळल्याने संपूर्ण शेड खाली आली आणि त्यात अनेकजण दबले गेले.

अधिक वाचा  : लवकर वेट लॉस करण्यासाठी रताळं आहे फायदेशीर
दुर्घटनेबाबत माहिती मिळताच प्रशासनाचं पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचलं. यासोबतच ढिगारा हटवण्यासाठी जेसीबी आणले आहेत.  जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, जोरदार वारा आणि पाऊस बचाव कार्यात अडथळा ठरत आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 50 ते 60 जण मंदिराच्या शेडखाली होते. ज्यावेळी सोसाट्याचा वारा सुटला, त्यावेळी काही लोकं मंदिराच्या आतमध्ये गेले, तर 15 ते 20 जण मंदिराच्या शेडमध्ये होते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लिंबाचं झाडं शेडवर कोसळलं आणि शेड कोसळलं. शेडखाली उभी असलेली लोक शेडखाली अडकले.  आतापर्यंत 7 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. अद्याप बचाव कार्य सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी