महाराष्ट्र हादरला ! धावत्या एसटी बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग, 'या' जिल्ह्यातील घटना

19 years old boy for rape on minor in bus : आरोपीने सर्व प्लान आखत अल्पवयीन मुलीला नागपूर येथे फिरायला जाऊ असं आमिष दाखवले. या अमिषाला पिडीत अल्पवयीन मुलगी बळी पडली,आणि तिने राजेशला होकार दिला. त्यानंतर राजेश आणि अल्पवयीन पिडीत मुलगी ही नागपूर येथे फिरायला निघाले. ते साकोली येथून बसने निघाले.  रात्रीची वेळ असल्यानं आणि बसमध्ये वाहक नसल्याचं पाहून आरोपीने बसच्या शेवटच्या सीटवर पिडीतेला बसवले आणि धावत्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अतिप्रसंग केला.

19 years old boy for rape on minor in bus
धावत्या एसटी बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आरोपी नराधमाने धावत्या एसटी बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग
  • पिडीत अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर साकोली पोलिसांनी गुन्हा दाखल
  • पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थिनी आणि राजेश मडावी यां दोघांना ताब्यात घेतलं.

भंडारा : राज्यात दिवसेंदिवस महिला आणि मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण काही थांबता थांबत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, भंडारा जिल्ह्यात देखील एका विध्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. सदर घटनेत आरोपी नराधमाने धावत्या एसटी बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग (Rape on Minor Girl in Bus) केल्याचा प्रकार समोर आला आहे. राजेश ईश्वर मडावी असं १९ वर्षीय आरोपीचे नाव असून, तो बोदरा येथील रहिवासी आहे. सदर अत्याचाराची घटना ही पोलीस स्टेशन परिसरात घडली असून, या प्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर साकोली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.  

अधिक वाचा : शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमान जयंतीचा दिवस आहे खूप

आरोपीने बसच्या शेवटच्या सीटवर धावत्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अतिप्रसंग केला

आरोपीने सर्व प्लान आखत अल्पवयीन मुलीला नागपूर येथे फिरायला जाऊ असं आमिष दाखवले. या अमिषाला पिडीत अल्पवयीन मुलगी बळी पडली,आणि तिने राजेशला होकार दिला. त्यानंतर राजेश आणि अल्पवयीन पिडीत मुलगी ही नागपूर येथे फिरायला निघाले. ते साकोली येथून बसने निघाले.  रात्रीची वेळ असल्यानं आणि बसमध्ये वाहक नसल्याचं पाहून आरोपीने बसच्या शेवटच्या सीटवर पिडीतेला बसवले आणि धावत्या बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अतिप्रसंग केला. त्यानंतर राजेश आणि पिडीत विध्यार्थिनी सकाळी नागपूर येथे पोहोचले. त्यानंतर आरोपी राजेशने तिला घेऊन आपल्या नातेवाइकाकडे गेला. मात्र नातेवाईकाला ही संपूर्ण परिस्थिती संशयित वाटली आणि त्यांनी राजेशला ताबडतोब घरातून निघून जाण्यास सांगितलं.

अधिक वाचा : अंकशास्त्राच्या मदतीने निवडा स्वत:चे योग्य करिअर 

पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थिनी आणि राजेश मडावी यां दोघांना ताब्यात घेतलं.

दरम्यान, राजेश मडावी या १९ वर्षीय तरुणाला त्यांच्या नातेवाईकांनी घरातून निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर राजेश हा मोठ्या संकटात सापडला होता. त्याला काय करावे सुचत नव्हते त्यामुळे त्याने थेट नाईलाजाने अल्पवयीन पिडीतेसह रात्रीचआपले गाव बोदरा येथे परत आला. मात्र, या अगोदर अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी शोध सुरू केला तेव्हा बोदराच्या पोलीस पाटलांनी बेपत्ता विद्यार्थिनी राजेश मडावीसोबत गावातच असल्याची माहिती पोलिसांना दिली आणि पोलीसानी गावात जाऊन दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांचीही साकोली उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर राजेश मडावी याच्यावर कलम भादंवि ३७६, ३६३ आणि पॉक्सोन्वये गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा : हनुमान जयंतीच्या दिवशी करू नका ही ५ कामे, नाहीतर पडतील भारी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी