डीएडला शिकणारी मुलगी टाईमपास म्हणून एकटीच पाळण्यावर बसून झोके घेत होती , अचानक घडल असं की झाला जाग्यावरचं मृत्यू

21 year old ded student girl death : पाळण्याच्या दोरीवर उशी टाकून ती बसलेली होती. अचानक उशी सरकल्याने ती खाली कोसळून बेडच्या काठावर पडली आणि पाळण्याची दोरी दुर्दैवाने तिच्या गळ्याभोवती अडकली आणि तिला फास बसला.

21 year old ded student girl death
पाळण्यावर बसून झोके घेत असताना झाला मृत्यू   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कल्याणीला सर्वोपचार रुग्णालयामध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले
  • टाईमपास म्हणून ती एकटीच पाळण्यावर बसून झोके घेत होती.
  • लेकीच्या मृत्यूने आई-वडिलांवर आभाळ कोसळलं

अकोला : डीएड विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकचं खळबळ उडाली आहे. झोका घेताना पाळण्याच्या दोरीचा गळफास लागून डीएडमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यानं , सदर घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील रिधोरा या गावात घडली आहे. कल्याणी दिपक पोटे असं या दुर्घटनेत मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात शोकाळला पसरली आहे.

टाईमपास म्हणून ती एकटीच पाळण्यावर बसून झोके घेत होती.

घडलेली घटना अशी आहे की , कल्याणी पोटे सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घरातील पाळण्यावर बसून झोके घेत होती. ही पाळण्याच्या दोरीवर उशी टाकून ती बसलेली होती. अचानक उशी सरकल्याने ती खाली कोसळून बेडच्या काठावर पडली आणि पाळण्याची दोरी दुर्दैवाने तिच्या गळ्याभोवती अडकली आणि तिला फास बसला. आणि तिचा गळफास घेऊन मृत्यू झाला. घटना घडली यावेळी कल्याणीची आई घराच्या गच्चीवर काम करत होती. कल्याणीचे वडील बाहेरगावी ड्यूटीवर गेले होते. त्यामुळे तिच्या जवळ कोणीही नव्हते. टाईमपास म्हणून ती एकटीच पाळण्यावर बसून झोके घेत होती. यावेळी ही दुर्घटना घडली आणि कल्याणीचा जीव गेला.

कल्याणीला सर्वोपचार रुग्णालयामध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले

कल्याणी ज्यावेळी खाली पडली त्यावेळी तिच्या गळ्याला बेडचा देखील जबर मार लागला होता. आणि जवळ कोणी नसल्यामुळे काही वेळ ती तशीच पडून होती. काही वेळानंतर तिची आई गच्चीवरुन खाली आल्यानंतर तिने कल्याणीला पहिले आणि हा प्रकार उघडकीस आला. तिच्या आईने कल्याणीला पाहताच आरडाओरड केल्याने शेजारी नागरिक आले आणि त्यांनी कल्याणीला सर्वोपचार रुग्णालयामध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 



लेकीच्या मृत्यूने आई-वडिलांवर आभाळ कोसळलं

अत्यंत शोकाकुल वातावरणात मृत कल्याणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. तर, कल्याणी ही परिवारासह सर्वांचीच आवडती होती. लेकीच्या मृत्यूने आई-वडिलांवर आभाळ कोसळलं आहे अशी चर्चा संपूर्ण गावात होत आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी