गडचिरोलीत २६ नक्षलवादी ठार

26 Naxalites killed in Gadchiroli महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी सी ६० युनिटच्या पोलिसांनी केलेल्या कारवाई २६ नक्षलवादी ठार झाले. चकमकीत तीन पोलीस जखमी झाले. 

26 Naxalites killed in Gadchiroli
गडचिरोलीत २६ नक्षलवादी ठार 
थोडं पण कामाचं
  • गडचिरोलीत २६ नक्षलवादी ठार
  • चकमकीत तीन पोलीस जखमी झाले
  • चकमक गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातील मर्दिनटोला जंगल परिसरात झाली

26 Naxalites killed in Gadchiroli । गडचिरोली: महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी सी ६० युनिटच्या पोलिसांनी केलेल्या कारवाई २६ नक्षलवादी ठार झाले. चकमकीत तीन पोलीस जखमी झाले. 

छत्तीसगडमधून मोठ्या संख्येने नक्षलवादी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर जंगलाच्या विशिष्ट भागाला घेराव घालून पोलिसांनी नक्षलवाद्यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. यावेळी झालेल्या चकमकीत २६ नक्षलवादी ठार झाले. चकमक गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातील मर्दिनटोला जंगल परिसरात झाली. 

चकमकीत जखमी झालेल्या पोलिसांना हेलिकॉप्टरमधून नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. नक्षलविरोधी कारवाईसाठी पोलिसांची मोठी कुमक मर्दिनटोला जंगल परिसरात दाखल झाली आहे. नक्षलवाद्यांविरोधातील ही अलिकडच्या काळातील मोठी कारवाई आहे. नक्षलवाद्यांचे एक-दोन मोठे नेते पोलीस कारवाईत ठार झाल्याचे वृत्त आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी