३२ वर्षीय तरुणाची आत्महत्या , पाठीमागे कॅन्सरग्रस्त वडील, आजारी आई, व्हिडीओत खळबळजनक आरोप

32 years old farmer commits Suicide : प्रवीणने आत्महत्येपूर्वी शूट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, सोयाबीन आणि उडीदला भाव नसल्याने मी कर्जबाजारी झालो आहे. म्हणून मी आत्महत्या करत आहे, सदर घटनेनंतर साखरी गावात एकच खळबळ उडाली आहे.

32 years old farmer commits Suicide
३२ वर्षीय तरुणाची आत्महत्या , पाठीमागे कॅन्सरग्रस्त वडील  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोयाबीन आणि उडीदला भाव नसल्याने मी कर्जबाजारी झालो
  • प्रवीण शेती पिकत नसल्या कारणाने वारंवार कर्ज काढून तो शेतीला लावायचा
  • छोटा ट्रॅक्टर फायनान्स कंपनीचे अधिकारी घेऊन गेले.

32 years old farmer commits Suicide अकोला : कर्जाला कंटाळून एका युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोला जिल्हातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील साखरी या गावातील एका ३२ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव प्रवीण बाबूलाल पोळकट असे आहे. दरम्यान , प्रवीण बाबूलाल पोळकट या शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ शूट केला आहे. कर्जाला कंटाळून त्याने आपले आयुष्य संपवल्याचा खुलासा सदर व्हिडीओत केला आहे. आपल्या आत्महत्येला एका बड्या कंपनीचे अधिकारी जबाबदार असल्याचा दावा त्याने व्हिडीओतून केला आहे. त्यामुळे, प्रवीण पोळकटच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सोयाबीन आणि उडीदला भाव नसल्याने मी कर्जबाजारी झालो

प्रवीणने आत्महत्येपूर्वी शूट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, सोयाबीन आणि उडीदला भाव नसल्याने मी कर्जबाजारी झालो आहे. म्हणून मी आत्महत्या करत आहे, सदर घटनेनंतर साखरी गावात एकच खळबळ उडाली आहे.

प्रवीण शेती पिकत नसल्या कारणाने वारंवार कर्ज काढून तो शेतीला लावायचा

शेती पिकत नसल्या कारणाने वारंवार कर्ज काढून तो शेतीला लावायचा, मात्र शेतात पीकच येत नसल्याने ते कर्ज वाढतं गेलं. अकोला जिल्हातल्या मूर्तिजापूर तालुक्यातील साखरी येथील ३२ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी प्रवीण बाबूलाल पोळकट याच्याकडे वडिलांच्या नावाने फक्त तीन एकर कोरडवाहू शेती आहे. या तीन एकर शेतीवर को-ऑपरेटिव्ह बँकेचे कर्ज आणि त्यासोबतच महिंद्रा कोटकचेही कर्ज आहे.

छोटा ट्रॅक्टर फायनान्स कंपनीचे अधिकारी घेऊन गेले.

दरम्यान, प्रवीणने शेती पिकत नसल्याने एक छोटा ट्रॅक्टर घेतला होता. त्यातून तो थोडेफार पैसे कमवत होता. मात्र, छोटा ट्रॅक्टर फायनान्स कंपनीचे अधिकारी घेऊन गेले. त्यामुळे प्रवीणला मानसिकता धक्का बसला. या सर्व गोष्टीचा त्याच्या मनावर परिणाम झाला आणि वारंवार येणाऱ्या अडचणींमुळे तो अधिकच व्यथित झाला होता. त्यामुळे त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

प्रविणच्या वडिलांना तोंडाचा कर्करोग आहे

पत्नी, दोन मुलं आणि आई-वडिलांचा सांभाळ करायचा. आई - वडिलांना प्रवीण हा एकुलता एक मुलगा होता. या घटनेनंतर त्याच्या परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. त्याचबरोबर आत्महत्या केलेल्या प्रविणच्या वडिलांना तोंडाचा कर्करोग देखील आहे. आणि आई सतत आजारी असते, अशा परिस्थितीत अनेक अडचणींना तो तोंड देत होता. मात्र, त्याने आत्महत्या केल्यानंतर घरच्या लोकांची परस्थिती प्रचंड अवघड झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी