भाजपच्या माजी राज्यमंत्र्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात चौघांचा मृत्यू

नागपूर
विजय तावडे
Updated Dec 29, 2021 | 16:58 IST

4 dead in electric shock in amravati : विजेच्या शॉकने मृत्यू पावलेले हे चौघेही याचं महाविद्यालयात कर्मचारी या पदावर कार्यरत होते. रंगरंगोटी करण्यासाठी लोखंडी शिडीवर सर्व जण चढले असता वरून विजेच्या तारा असल्याने या तारेचा धक्का लागल्याने चारही जणांना जोरदार शॉक लागला.

4 dead in electric shock in amravati
भाजपच्या माजी राज्यमंत्र्याच्या महाविद्यालयात चौघांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कर्मचारी शिडीवर चढून रंगरंगोटी करत असताना शिडीला विद्यूत तारेचा स्पर्श झाला
  • कॉलेज प्रशसनाने बाहेरुन मजूर न बोलावता थेट कॉलेजमधील कर्मचारीच कॉलेजच्या गेटच्या रंगरोटीसाठी करायला लावली
  • हलगर्जीपणा करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे

अमरावती: अमरावती मध्ये आज एक  दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत एकूण चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. महाविद्यालयात रंगरंगोटी करत असताना चार कर्मचाऱ्यांना शॉक लागल्याने या कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर महाविद्यालय हे भारतीय जनता पार्टीचे नेते माजी राज्यमंत्री आमदार प्रवीण पोटे यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ही दुर्देवी घटना घडली आहे. सदर घटनेनंतर काही काळ तणावाचे देखील वातावरण असल्याची माहिती मिळाली आहे. हे माविद्यालय प्रवीण पोटे यांचं असून, याचं नाव पीआर पोटे इंजिनीयरिंग महाविद्यालय असं आहे.

कर्मचारी शिडीवर चढून रंगरंगोटी करत असताना शिडीला विद्यूत तारेचा स्पर्श झाला

सदर घडलेली घटना अशी आहे की, पीआर पोटे इंजिनीयरिंग महाविद्यालय या महाविद्यालयातील कर्मचारी महाविद्यालयाच्या मुख्य गेटची रंगरंगोटी करत होते. मात्र, या गेटजवळून हायपॉवरची वायर गेली आहे. कर्मचाऱ्यांच्या हे लक्षात आले नाही आणि हे कर्मचारी शिडीवर चढून रंगरंगोटी करत होते. दरम्यान काम सुरु असताना अचानकपणे शिडीला विद्यूत तारेचा स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना भयंकर शॉक लागला. त्यामुळे हे चारही कर्मचारी शिडीला चिकटले. हायपॉवरची वायर असल्याने त्यानंतर या सर्वाना जोराचा झटका देखील बसला आणि सर्वजण खाली कोसळले. शॉक इतका भयानक होता की यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कॉलेज प्रशसनाने बाहेरुन मजूर न बोलावता थेट कॉलेजमधील कर्मचारीच कॉलेजच्या गेटच्या रंगरोटीसाठी करायला लावली

विजेच्या शॉकने मृत्यू पावलेले हे चौघेही याचं महाविद्यालयात कर्मचारी या पदावर कार्यरत होते. रंगरंगोटी करण्यासाठी लोखंडी शिडीवर सर्व जण चढले असता वरून विजेच्या तारा असल्याने या तारेचा धक्का लागल्याने चारही जणांना जोरदार शॉक लागला. त्यात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे कॉलेज प्रशसनाने बाहेरुन मजूर न बोलावता थेट कॉलेजमधील कर्मचारीच कॉलेजच्या गेटच्या रंगरोटीसाठी लावल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

हलगर्जीपणा करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे

चारही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून हे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 

अशी आहेत मृत कर्मचाऱ्यांची नावे?

या दुर्देवी घटनेत अक्षय सावरकर (वय २६), प्रशांत शेलोरकर (वय ३१), संजय दंडनाईक (वय ४५) आणि गोकुळ वाघ (वय २९) असे चारही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ते चौघेही याच कॉलेजमध्ये शिपाई पदावर कार्यरत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी