सोलापूरहून सुटलेल्या एसटी बसचा यवतमाळजवळ भीषण अपघात, चार मजुरांचा मृत्यू 

नागपूर
रोहित गोळे
Updated May 19, 2020 | 09:15 IST

सोलापूरहून झारखंडसाठी सुटलेल्या एका एसटी बसला यवतमाळजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

4 migrant workers killed 22 injured after a bus they were traveling in crashed into a truck in yavatmal
सोलापूरहून सुटलेल्या एसटी बसचा यवतमाळजवळ भीषण अपघात, चार मजुरांचा मृत्यू   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • यवतमाळजवळ एसटी बसला भीषण अपघात
  • ट्रकने एसटीला दिली मागून धडक, अपघातात ४ प्रवासी मजुरांचा मृत्यू
  • सोलापूरहून झारखंडसाठी सोडण्यात आली होती एसटी बस

यवतमाळ: देशभरात लॉकडाऊन जारी असल्याने प्रवासी मजुरांची बरीच कुचंबणा होत आहे. त्यामुळे हे मजूर आपल्या गावी परतण्यासाठी धडपड करत आहे. त्यासाठी मिळेल त्या वाहनाने ते आपलं घर गाठण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या दरम्यान, होणाऱ्या अपघातात अनेक मजुरांना आतापर्यंत आपले प्राण गमवावे लागले आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून झारखंडला निघालेल्या एका एका एसटी बसला यवतमाळ येथे भीषण अपघात झाला असून यात चार मजुरांचा मृत्यू झाला आहे. 

मजुरांना झारखंडला घेऊन जाणाऱ्या या एसटी बसला मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, ज्यामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास यवतमाळ येथील कोळवन गावाजवळ हा अपघात झाला. 

या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून २२ जण  जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

दरम्यान, तीन दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमधील औरैया येथे झालेल्या भीषण अपघातात तब्बल २४ मजुरांना आपेल प्राण गमवावे लागले होते. 

मध्य प्रदेशातही मजुरांनी गमावले प्राण 

याच आठवड्यात प्रवासी मजुरांसह मध्यप्रदेशमधील गुना येथे देखील एक मोठा अपघात झालाय. ज्यामध्ये आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. हे मजूर देखील यूपीला परतत होते. त्यावेळी एका ट्रकने बसला धडक दिली. हे प्रवासी मजूर ट्रकवर चढले होते. या अपघातात आठ मजुरांचा बळी गेला तर ५५ जण जखमी झाले. ट्रकमध्ये सुमारे ६५ प्रवासी मजूर होते. जे महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला परतत होते.

औरंगाबादमध्ये १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू 

यापूर्वी, महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे एक भीषण अपघात घडला होता. येथे रेल्वे ट्रॅकवर झोपलेल्या तब्बल २० प्रवासी मजुरांना मालगाडीने उडवलं होतं. त्यातील १६ जणांचा मृत्यू झाला होता. हे  मजूर जालना येथून मध्य प्रदेशकडे पायीच निघाले होते. दरम्यान हे मजूर थकून-भागून विश्रांतीसाठी रेल्वे ट्रॅकवरच विसावले. तर काही जण जवळच्या शेतात बसले. यावेळी या सगळ्यांना झोप लागली. याच दरम्यान, एका मालगाडीखाली हे मजूर सापडले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी