नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकच्या गेटच्या बाजूला ट्राफिक पोलीस बूथ चा पाठीमागे ऐका बॅगेत जिलेटियन च्या 54 कांड्या सापडल्याने खळबळ उडाली.
रेल्वे पोलिसांनी ह्या बॅगेला बॉम्बशोधक पथकाकडे सोपविण्यात आले आहे. बॉम्ब शोधक पथकाने ह्या सर्व जिलेटियनच्या कांड्यांना पोलीस मुख्यालयाकडे घेऊन गेले असून ह्या जिलेटियन कांड्यानं डीफूज करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकावर ही बॅग कोणी आणून ठेवली आता पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
नागपूर रेल्वे स्थानकावर संशयास्पद वस्तू असलेली बॅग सापडली आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) आणि बीडीडीएस (बॉम्ब शोध आणि निकामी पथके) तपास करत आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे आरपीएफ अधिकारी आशुतोष पांडे यांनी दिले.
नागपूर शहरातील मुख्य रेल्वे स्थानक कंपाऊंड परिसरातून सुरक्षा पोलिसांनी एक बॅग जप्त जप्त केली आहे. बॅगमध्ये छोट्या आकाराच्या डिटोनेटर्स (जिवंत स्फोटके) आढळून आले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. जप्त करण्यात आलेले डिटोनेटर्स खाण (मायनिंग) मध्ये ब्लास्ट करण्याच्या कामात येतात. बॅगमध्ये जिवंत स्फोटके असल्याचे निष्पन्न होताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. बीडीडीएस पथकाने स्फोटके भरलेली बॅग ताब्यात घेऊन ती सुरक्षित ठिकाणी हलवली आहे.
लोहमार्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी संदीप तुमडाम यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक काळ्या रंगाचा बॅग दिसली. संदीप यांनी त्या बॅगची तपासणी केली असता बॅगमध्ये एका डीटोनेटरला 54 जिलेटिनच्या कांड्या वायरने जोडण्यात आल्या असल्याचे दिसताच याबाबत लोहमार्ग पोलीस विभागातील वरिष्ठांना सूचना देण्यात आली. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहेत.