फुग्याने घेतला चिमुरड्याचा जीव; फुगा फुगवता फुगवता फुटला अन् घशात अडकला, 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

नागपूर
भरत जाधव
Updated Nov 03, 2021 | 16:32 IST

6-year-old boy Died ऐन दिवाळीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. नागपुरात (nagpur) एका 6 वर्षीय मुलाच्या (6-year-old boy) घशात फुगा अडकल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

6-year-old boy died after inflating balloon
फुग्याने घेतला चिमुरड्याचा जीव  |  फोटो सौजन्य: Indiatimes

6-year-old boy Died नागपूर : ऐन दिवाळीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. नागपुरात (nagpur) एका 6 वर्षीय मुलाच्या (6-year-old boy) घशात फुगा अडकल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या (Nandanvan Police Station) हद्दीत घडली आहे. फुगा फुगवत असताना तो फुटला आणि चिमुकल्याच्या घशात अडकला. फुगा घशात अडकल्याने या चिमुकल्याला आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनेत संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदनवन परिसरातील स्वराज विहार कॉलनी येथे ही घटना घडली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास 6 वर्षीय चिमुकला आपल्या घराच्या बाहेर फुग्यांसोबत खेळत होता. यावेळी तो फुगा फुगवण्याचा प्रयत्न करत होता. फुगा फुगवता फुगवता अचानक फुटला आणि मग त्याचा एक तुकडा चिमुकल्याच्या घशात अडकला. फुग्याचा तुकडा घशात अडकल्याने या चिमुकल्याला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला. घरच्या लोकांना हा प्रकार कळताच त्यांनी त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने सर्वांना एक धक्का बसला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी