धक्कादायक : ५ वर्षाच्या मुलाला कुत्र्यांच्या कळपाने चाऊन चाऊन खाले

A 5 year old boy was bitten by a pack of dogs :  या कुत्र्यांच्या कळपाने त्या निरागस बालकावर हल्ला केल्यावर ते मूल स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत राहिले, मात्र कुत्र्यांच्या कळपापासून ते मूल स्वत:ला वाचवू शकले नाही, या कुत्र्यांनी त्या मुलाला ओढत जवळ एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेले. ते खाजवून खाल्ल्याने मुलाला एवढी जखम झाली की काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

A 5 year old boy was bitten by a pack of dogs
५ वर्षाच्या मुलाला कुत्र्यांच्या कळपाने चाऊन चाऊन चाऊन खाले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ५ वर्षाच्या निष्पाप मुलाला भटक्या कुत्र्यांच्या कळपाने फस्त केल्याची घटना घडली आहे
  • कुत्र्यांनी त्या मुलाला ओढत जवळ एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेले
  •  काटोल येथील धंतोली या पॉश भागात ही घटना घडली

नागपूर : नागपूरच्या (nagpur) काटोल या ग्रामीण भागातून एका ५ वर्षाच्या निष्पाप मुलाला भटक्या कुत्र्यांच्या कळपाने फस्त केल्याची वेदनादायक बातमी समोर आली असून जखमी बालकाचा मृत्यू झाला आहे.  ही घटना आज सकाळी घडली, पाच वर्षीय विराज राजू जयवार हा आपल्या मोठ्या बहिणीसोबत सकाळी ६ वाजता फिरायला (मॉर्निंग वॉक) गेला असता, या मुलाला भटक्या कुत्र्यांच्या कळपाने घेरले. हा प्रकार त्याच्या बहिणीने बघितला.ती जोरजोरात ओरडू लागली, पण सकाळची वेळ असल्याने इथे काहीच हालचाल होत नव्हती, त्यामुळे कोणीही मदतीला आले नव्हते.

अधिक वाचा : या गोष्टींचे चुकूनही करू नका दान, येऊ शकते मोठे आर्थिक संकट

कुत्र्यांनी त्या मुलाला ओढत जवळ एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेले

 या कुत्र्यांच्या कळपाने त्या निरागस बालकावर हल्ला केल्यावर ते मूल स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत राहिले, मात्र कुत्र्यांच्या कळपापासून ते मूल स्वत:ला वाचवू शकले नाही, या कुत्र्यांनी त्या मुलाला ओढत जवळ एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेले. ते खाजवून खाल्ल्याने मुलाला एवढी जखम झाली की काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

अधिक वाचा : श्रीलंकेची आर्थिक स्थिती खराब तरीदेखील रंगणार LPL चा थरार 

 काटोल येथील धंतोली या पॉश भागात ही घटना घडली

 सदर घटना काटोल येथील धंतोली या पॉश भागात ही घटना घडली असून, यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे, मुलाच्या वडिलांचे नाव राजू जयवार असून ते व्यवसायाने शेतकरी आहेत.

अधिक वाचा : अरूण जेटली स्टेडियमवर आपापसात भिडले फॅन्स, पाहा व्हिडीओ

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी