गरोदर महिलेसोबत घडली धक्कादायक घटना

A 9-month pregnant woman died after falling into the lake ; गर्भवती महिला तलावावर कपडे धुण्यासाठी गेली होती. यावेळी तिचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने गावात मोठी शोककळा पसरली आहे. मोहाडी तालुक्यातील लेंडेझरी या गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. 

A 9-month pregnant woman died after falling into the lake
9 महिन्याची गरोदर महिलेसोबत घडली धक्कादायक घटना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गर्भवती महिला तलावावर कपडे धुण्यासाठी गेली असताना तलावात पडून झाला मृत्यू
  • कपडे धुत असताना पाय घसरला आणि ती खोल पाण्यात पडली
  • पाण्यावर राजकुमारीची साडी पाण्यावर तरंगताना दिसली

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. गर्भवती महिला तलावावर कपडे धुण्यासाठी गेली होती. यावेळी तिचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने गावात मोठी शोककळा पसरली आहे. मोहाडी तालुक्यातील लेंडेझरी या गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे.  मृत्यू झालेली महिला ही 9 महिन्याची गरोदर होती, अशी माहिती मिळाली आहे. 9 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

अधिक वाचा ; इलॉन मस्क बोलतच राहिले आणि कर्मचाऱ्यांनी सोडल्या नोकऱ्या

कपडे धुत असताना पाय घसरला आणि ती खोल पाण्यात पडली

मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमारी सुनिल नेवारे (30) असं पाण्यात पडून मृत्यू झालेल्या मृत महिलेचे नाव असून राजकुमारी नऊ महिन्याची गर्भवती होती. ती नेहमी प्रमाणे सकाळी गावाजवळील हुटकाळा तलावावर कपडे धुण्यासाठी गेली होती. रोजची सवय असल्याने तिला काही घडेल असं वाटलं नसावे. ज्या ठिकाणी खोल पाणी होते त्या ठिकाणी ती कपडे धुण्यासाठी बसली होती. मात्र, अचानक राजकुमारीचा पाय घसरला आणि ती खोल पाण्यात पडली. राजकुमारी नेवारे यांनी जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला पण जवळपास कुणीच नसल्यामुळे मदतीला कुणी धावून आलं नाही. पाण्याची पातळी खोल असल्यामुळे तिने गटांगळया देखील खाल्ल्या, आणि अखेर तिचा मृत्यू झाला.

अधिक वाचा ; Rip Twitter: मस्कला झालंय तर काय? शेअर केली ट्विटरची कबर

पाण्यावर राजकुमारीची साडी पाण्यावर तरंगताना दिसली

दरम्यान, राजकुमारीची सून रात्रीच्या वेळी शेळ्या चारुन घरी आली तेव्हा सून आपली सून घरी न दिसल्याने  सासूने शेजारी आणि गावात विचारपूस केली पण कुठेच पत्ता लागला नाही. तेव्हा आपली सून दुपारीच तलावावर कपडे धुण्यासाठी गेली असल्याचे कळले. तेव्हा गावातील काही मंडळींनी तलावावर धाव घेतली असता पाण्यावर राजकुमारीची साडी पाण्यावर तरंगताना दिसली. काय घडलं याचा अंदाज आल्यामुळे त्यांनी एकच आक्रोश केला होता.

अधिक वाचा ; नागपुरात तरुणांना वायुसेनेकडे आकर्षित करण्यासाठी एअर शो 

मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर येथील रूग्णालयात पाठविण्यात आला

राजकुमारीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून तात्काळ दवाखान्यात पाठवण्यात आला असता डॉक्टरांनी राजकुमारीला तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी तुमसर येथील रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.

अधिक वाचा ; मत मांडा ! Data Protection Billवर सरकारला हव्यात प्रतिक्रिया

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी