नागपूर : दोन वर्षांनंतर ईद-उल-अज्हा अर्थात बकरी ईद रविवारी साजरी केली जाणार असली, तरी बकरे खरेदीसह 'हिस्सा' बुकिंग करण्याची लगबग वाढली आहे. दोन वर्षे करोनामुळे शाही नमाज झाले. मात्र, कुर्बानीसाठी एकत्रित येता येत नव्हते. मात्र, यंदा सर्वबंधने हटल्याने खरेदी उत्स्फूर्तपणे सुरू असून, मुस्लिम बांधवांनी हिस्सा बुकिंग करण्याला प्राधान्य दिले आहे. परिणामी, बकऱ्यांची आवक वाढली असतानाही बकरे महागले आहेत. नागपूरच्या बाजारपेठेत जमनापारी, चंबळ, सोजत, हंसा जातीच्या बकऱ्यांची किंमत अडीच ते तीन लाखांच्या आसपास आहेत. (A goat worth Rs 2.5 lakh was sold in Nagpur market on the occasion of Goat Eid)
अधिक वाचा : Viral Video : पोलिसाच्या अंगावर घातली कार, पहा व्हिडीओ
बकरी ईदनिमित्त बोकडांची मागणी वाढली आहे. राज्यातील विविध बाजारांमध्ये मोठ्या स्वरुपात बोकडांची विक्री सुरू आहे. स्थानिक गावरान बोकडांसह पंजाब आणि राजस्थानमधून आलेले अजमेरी, इंदुरी आणि सिरोही प्रजातीच्या बोकडांची किंमत दहा टक्क्यांनी वाढली आहे. नागपूरच्या बाजारात वसीम खान यांनी जमनापारी, चंबळ, सोजत आणि हंसा जातीच्या बकरे पाचारण केले आहेत, एका विक्रेत्याने पाच फूट उंचीच्या बोकडाची किंमत तब्बल अडीच लाख रुपये ठेवली आहे. तसेच गतवर्षी ८ ते १२ हजार रुपयांना असलेले बोकडांची यावर्षी १० ते १५ हजार रुपयांनी विक्री होत आहेत.