बच्चू कडूंच्या मेळाव्याच्या ठिकाणी झळकले 'मै झुकेगा नही' चे पोस्टर, बच्चूभाऊ 'कडू' भूमिका घेण्याच्या चर्चा

A grand gathering of Bachu Kadu will be held in Amravati. ; बच्चू कडू यांच्या विरोधात एका कार्यक्रमात आमदार रवी राण यांनी एक वक्तव्य केलं होतं. 'मी काही गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भय्या, सबसे बडा रुपय्या' है या मतदारसंघातल्या आमदाराचं 'स्लोगन' आहे, असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं होत. त्याचबरोबर बच्चू कडूंवर गुवाहाटीला जाऊन 50 खोके घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता.

A grand gathering of Bachu Kadu will be held in Amravati.
कडूंच्या मेळाव्याच्या ठिकाणी झळकले 'मै झुकेगा नही' चे पोस्टर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अमरावती येथे बच्चू कडूंच्या प्रहराचा होणार भव्य मेळावा
  • बच्चू कडू मेळाव्यात नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
  • वाद मिटवण्यासाठी फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक बोलावण्यात आली होती

अमरावती : गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू यांचा अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) व त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यामध्ये शा‍ब्दिक वाद सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा वाद मिटवला असला तरी, अमरावतीत  आज बच्चू कडू  (Bacchu Kadu) यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचा मोठा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. राणा दांपत्यासोबत सुरु असलेल्या वादाबाबत प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू आयोजित मेळाव्यात नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बच्चू कडू यांचा ज्या ठिकाणी मेळावा आयोजित करण्यात आला आहे, त्या ठिकाणी 'मै झुकेगा नही' अशा आशयाचे पोस्टर झळकले आहेत. बच्चू कडू यांच्या लागलेल्या या पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

अधिक वाचा ; आला! भारताचा स्वतःचा डिजिटल रुपया आला...आरबीआयची चाचणी सुरू

वाद मिटवण्यासाठी फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक बोलावण्यात आली होती

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असलेले बच्चू कडू यांचा वाद राणा दांपत्यासोबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. दोघेजणही एकमेकांवर जोरदार आरोप करत आहेत. आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडू यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.  बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यानंतर रवी राणा यांनी याबबात दिलगिरी व्यक्त करत आपलं वक्तव्य मागे घेतलं होतं. तसेच आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद मिटवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर बैठक बोलावण्यात देखील आली होती. या बैठकीला आमदार रवी राणा गेले होते. परंतू बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घेतली नव्हती. रवी राणा यांनी आपले शब्द माघारी घेतल्यानंतर बच्चू कडू यांनीही आपले शब्द मागे घ्यावेत अशी मागणी रवी राणा यांनी केली होती. दरम्यान, बच्चू कडू यांनी आज अमरावती येथे आयोजित मेळाव्यात आपले शब्द मागे घेतात की, पुन्हा रवी राणा यांच्यावर निशाणा साधतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा ; Bridge Collapse: 'या' आहेत भारतातील भयानक पूल दुर्घटना

नेमका काय आहे राणा दाम्पत्य आणि कडू यांच्यामधील वाद?

बच्चू कडू यांच्या विरोधात एका कार्यक्रमात आमदार रवी राण यांनी एक वक्तव्य केलं होतं. 'मी काही गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भय्या, सबसे बडा रुपय्या' है या मतदारसंघातल्या आमदाराचं 'स्लोगन' आहे, असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं होत. त्याचबरोबर बच्चू कडूंवर गुवाहाटीला जाऊन 50 खोके घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्याशिवाय हा 'तोडपाणी' करणारा आमदार असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली होती.  त्याला प्रत्युत्तर देताना बच्चू कडू यांनी रवी राणांविषयी अपशब्दांचा वापर केला यानंतर राणा दांपत्य आणि कडू यांच्यातील वाद हा वाढत गेला होता. रवी राणांना या आरोपाबाबत पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले होते. याबाबत रवी राणांना एक नोव्हेंबरचा अल्टीमेटम दिला होता. तो अल्टीमेटम आज संपत आहे. अद्याप रवी राणांनी याबाबत कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. त्यांनी दिलगिरी व्यक्त करत आपले शब्द मागे घेतले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी