Viral Video in Nagpur, नागपूर : नागपूर पोलिसांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ नागपूरच्या सक्करधारा परिसरातील तिरंगा चौकाजवळचा आहे, या व्हिडिओमध्ये हॉटेलच्या गार्डची नागपूर पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या हवालदाराशी झटापट होत आहे. त्यानंतर पोलीस हवालदाराने त्या रक्षकाला कानाखाली मारली, यानंतरही हा गार्ड पोलिसांशी बाचाबाची करताना दिसतो, दरम्यान पोलीस कर्मचारी वॉकी टॉकीने जवळच्या पोलीस स्टेशनला याची माहिती देतो, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ( A Nagpur police constable slaped a hotel guard )
वास्तविक या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली ती नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांपासून, नागपुरात सध्या नो पार्किंगमधून वाहने उचलण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले आहेत. नागपूर शहरातील 10 झोनपैकी 3 झोनचे काम सुरू आहे.
नागपूर पोलीस हवालदाराने हॉटेलच्या गार्डला मारली कानाखाली, नो पार्किंगवरून वाद, व्हिडिओ व्हायरल#nagpur #police #crime pic.twitter.com/vZSZ4GkB1e — Timesnowmarathi (@timesnowmarathi) July 26, 2022
नागपूर शहरातील रस्त्यांच्या कडेला पार्क केलेली नो पार्किंगची वाहने उचलणे, एका खासगी कंपनीला दिलेल्या या कामात नागपूर पोलिसांचा वाहतूक विभागाचा अधिकारी आहे. तर खासगी कंपनीच्या चालकाकडे तीन ते चार मुले काम करतात.
ते रस्त्याच्या कडेला उभी केलेली वाहने उचलतात, या घटनेदरम्यान नागपुरातील तिरंगा चौकात अनेक हॉटेल्स आहेत, हॉटेलसमोर अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात , अशा परिस्थितीत गाडी उचलण्यासाठी पोलिस पोहचल्यानंतर हॉटेलच्या गार्डने भांडण करण्यास सुरुवात केली आणि पोलिस कर्मचाऱ्याने त्याला कानाखाली मारली आणि आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.