Scrub Typhus : राज्यात दुर्मिळ 'स्क्रब टायफस' आजाराचा शिरकाव; या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण; जाणून घ्या काय आहेत लक्षणं?

नागपूर
भरत जाधव
Updated Aug 19, 2022 | 09:50 IST

कोविड संसर्गाची (covid infection) वाढती प्रकरणे आणि मंकीपॉक्सची (monkeypox) भीती वाढत असताना आता देशातील अनेक राज्यात आता आणखी एका आजाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. देशातील काही राज्यांतून स्क्रब टायफसचे रुग्ण आढळून आल्यानंतर चिंता वाढत आहे.

 A rare but deadly scrub typhus disease entered the state
दुर्मिळ पण घातक स्क्रब टायफस आजाराचा राज्यात शिरकाव  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • स्क्रब टायफस राज्यासाठी अत्यंत दुर्मिळ असा आजार असून तो जीवघेणा आहे.
  • आपल्या देशात या आजाराचे वर्षभरातून एक दोन रुग्ण हिमाचल प्रदेशात आढळतात.
  • बुलढाणा जिल्ह्यात स्क्रब टायफस चे रुग्ण आढळून आले आहेत.

Maharashtra News :  कोविड संसर्गाची (covid infection) वाढती प्रकरणे आणि मंकीपॉक्सची (monkeypox) भीती वाढत असताना आता देशातील अनेक राज्यात आता आणखी एका आजाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. देशातील काही राज्यांतून स्क्रब टायफसचे रुग्ण आढळून आल्यानंतर चिंता वाढत आहे. स्क्रब टायफस (Scrub Typhus) या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराने आता महाराष्ट्रात शिरकाव केल्याने आरोग्य विभाग आता हाय अलर्टवर आहे. स्क्रब टायफस राज्यासाठी अत्यंत दुर्मिळ असा आजार असून तो जीवघेणा आहे. 

दरम्यान या आजाराचे रुग्ण अफगाणिस्तान, पाकिस्तान, जपान, इंडोनेशिया आणि रशिया या देशातच आढळतात तर आपल्या देशात या आजाराचे वर्षभरातून एक दोन रुग्ण हिमाचल प्रदेशात आढळतात. परंत गेल्या काही दिवसांपासून या आजाराचे रुग्ण अनेक राज्यात आढळून आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्क्रब टायफसचे बहुतांश रुग्ण हे लहान मुले आहेत. आता मात्र आजाराने आपल्या राज्यात प्रवेश केला असून बुलढाणा जिल्ह्यात याचे रुग्ण आढळून आले आहेत.

Read Also : AK-47, काडतुसं असलेल्या बोटीचा तपास महाराष्ट्र ATS कडे

तब्बल नऊ जणांना याची लागण झाली आहे. एकट्या खामगाव तालुक्यात सात रुग्ण या आजाराने पीडित असल्याच समजताच आरोग्य प्रशासनाची यंत्रणा हाय अलर्ट मोडवर असल्याचं दिसून आलं आहे. खामगाव तालुक्यातील स्क्रब टायफसच्या एका रुग्णाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्याला अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

स्क्रब टायफस म्हणजे काय ?

स्क्रब टायफस हा आजार खरं तर आपल्या देशात अत्यंत दुर्मिळ असा आहे. उंदीर किंवा जंगलातील दाट गवतावरील एका प्रकारचा कीटक चावल्यावर यातील "ओरिएंशिया सुसूगामुशी" नावाचा जिवाणू आपल्या शरीरात गेल्यावर हा आजार होतो. या आजारामुळे मृत्यूचं प्रमाण 30 टक्के असल्याने हा आजार अतिशय घातक असल्याचं म्हटलं जातं. हा जिवाणू शरीरात गेल्यावर जवळपास 8 ते 10 दिवसांनी ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षण दिसून येतात. 

Read Also : विरार : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, तरुणी आणि २ तरुणांना अटक

अनेकदा रुग्ण मेंदूत ताप गेल्याने बेशुद्ध होऊन मरण पावतात त्यामुळे हा आजार होऊ किंवा पसरू नये म्हणून आता यंत्रणा कामाला लागली आहे. या आजाराचं निदान आणि उपचार शक्यतो शासकीय रुग्णालयात करणे आवश्यक असून यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविणे सोपे जाणार आहे. दरम्यान पावसाळ्यात हा आजार जास्त पसरण्याची शक्यता आहे. 

अशी घ्यावी काळजी 

  • माईट (कीटक) नियंत्रणासाठी कीटकनाशकाचा वापर करावा
  • झाडाझुडपात काम करताना पूर्ण बाह्याचे कपडे, हातमोजे, गमबूट वापरावेत
  • खुल्या जागी शौचाला जाणे टाळावे.
  • झाडाझुडपात काम करुन आल्यावर कपडे गरम पाण्यात भिजवून धुवावेत.
  • स्क्रब टायफसचे रुग्ण आढळून आलेल्या घराच्या जवळील छोटी मोठी खुरटी झाडं झुडपं काढून टाकावीत.
  • संक्रमित कीटक चावल्याने स्क्रब टायफसचा प्रसार होतो. या रोगाची लक्षणे साधारण चिकनगुनियाच्या आजारासारखी असतात. 
  • मात्र, स्क्रब टायफस अधिक घातक असल्यामुळे रुग्णाचा मृत्यू ओढावण्याची शक्यता जास्त असते. 
  • या रोगापासून वाचवण्यासाठी कपडे आणि अंथरूणावर परमेथ्रिन आणि बेंझिल बेंझोलेट शिंपडावे. 
  • स्क्रब टायफस या रोगावर कोणतीही लस उपलब्ध नाही. केवळ संक्रमित व्यक्तीपासून दूर राहणे, हा एकमेव बचावाचा मार्ग आहे. त्यामुळे या रोगाचे संक्रमण झाल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत गरजेचे आहे. 

पॅरासिटामोल न घेण्याचा सल्ला 

स्क्रब टायफस आजाराची लक्षणे दिसू लागल्यावर साधी वेदनाशामक किंवा पॅरासिटामॉलसारखी औषधे घेण्याऐवजी ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. स्क्रब टायफसची लक्षणे लवकर ओळखणे आणि त्यावर वेळीच उपचार केल्यास हा आजार गंभीर होण्यापासून रोखू शकतो.  स्क्रब टायफसच्या आजाराच्या वाढीसह, बहु अवयव निकामी होण्याचा धोका देखील वाढू शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी