दबा धरून बसला होता वाघ , तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या दाम्पत्यावर केला हल्ला, पुढे घडलं अस काही....

A tiger attacks a couple who went to pick tendu leaves : वाघाच्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर पती बेपत्ता होता. अखेर आज घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावरील डोंगराळ परिसरात विकास जांभूळकर हे गंभीर जखमी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले आहेत. विकास जांभूळकर यांना उपाचाराठी चिमूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

A tiger attacks a couple who went to pick tendu leaves
तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या दाम्पत्यावर वाघाचा हल्ला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या एका दांपत्यावर वाघाने प्राणघातक हल्ला केला
  • पतीला डोळ्याला अंधूक दिसत असल्याने ते एकमेकासोबत राहत होते
  • घटनास्थळापासून ५० मीटरवर विकासचा चष्मा रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला होता

नागपूर : तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या एका दांपत्यावर वाघाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना चिमूर तालुक्यातील केवाडा येथील जंगलात घडली होती. सदर घटना मंगळवारी सकाळी घडली असून, या घटनेत पत्नीचा जीव गेला आहे. मिना विकास जांभूळकर असं वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. वाघाच्या हल्ल्यात पती विकास जांभूळकर हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.

अधिक वाचा ; अजून दोन दिवस मुंबईत पाणी कपात, या भागात होणार मोठा परिणाम 

घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावरील डोंगराळ परिसरात सापडला पती

दरम्यान, वाघाच्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर पती बेपत्ता होता. अखेर आज घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावरील डोंगराळ परिसरात विकास जांभूळकर हे गंभीर जखमी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले आहेत. विकास जांभूळकर यांना उपाचाराठी चिमूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

अधिक वाचा ; गुजरातला जिंकवणाऱ्या मिलरला आधी कोणी नव्हते घेतले विकत, मग..

पतीला डोळ्याला अंधूक दिसत असल्याने ते एकमेकासोबत राहत होते

विकास जांभूळकर हे पत्नी मिना जांभूळकर हे दोघे पती पत्नी चिमूर तालुक्यातील केवाडा येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ते सतत तेंदूपत्ता तोडण्यासाठी गावापासून जवळ असलेल्या जंगलात जात होते. दरम्यान, घटनेच्या दिवशी देखील ते एक किमी अंतरावरील कक्ष क्रमांक ३४ मध्ये मंगळवारी सकाळी गेले होते. विकास जांभूळकर हे पत्नी मिना जांभूळकर यांच्या सोबत गावातील अनेक लोक गेले होते. परंतु, तेंदूपत्ता तोडत असताना सर्व लोक एकमेकांपासून दूर गेले. मात्र, जांभूळकर पती आणि पत्नी एकमेकासोबत राहून पाने तोडत होते. कारण, शिवाय पतीला डोळ्याला अंधूक दिसत असल्याने ते एकमेकासोबत राहत होते. हे दोघे पत्ता तोडत असताना याच जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने या दोघांवर हल्ला केला आणि यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला.

अधिक वाचा ; Navjot Singh Sidhu: जेलमध्ये सिद्धूसाठी आहे हे स्पेशल डाएट 

घटनास्थळापासून ५० मीटरवर विकासचा चष्मा रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला होता

दररोज नित्यक्रमाने जांभूळकर दाम्पत्य हे तेंदूपत्ता तोडण्यासाठी जाऊन घरी येत होते. परंतु काल साडे अकरा वाजेले तरी ते घरी परतले नाहीत. त्यामुळे लोकांनी दोघांची शोधशोध सुरु केली. यावेळी त्यांना केवाडा जंगलातील कक्ष क्र . ३४ येथे मीना जांभूळकर यांचा मृतदेह आढळून आला. तर घटनास्थळापासून ५० मीटरवर विकासचा चष्मा रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यामुळे विकासही कदाचित वाघाच्या हल्ल्यात ठार झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर विकास हे देखील बेशुद्ध अवस्थेत गावातील मंडळीना आढळून आले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी