Aaditya Thackeray : आम्ही काय कमी दिलं की त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला? आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला सवाल

सामान्य जनता ही शिवसेनेसोबतच आहे गद्दारांसोबत नाही अशी टीका शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केली, तसेच आम्ही काय कमी दिलं की त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला? असा सवालही आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला विचारला आहे.

थोडं पण कामाचं
  • सामान्य जनता ही शिवसेनेसोबतच आहे गद्दारांसोबत नाही
  • आम्ही काय कमी दिलं की त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला?
  • खोके सरकारमागे कोण होतं हे समोर आलेलं आहे.

Aaditya Thackeray : नागपूर : सामान्य जनता ही शिवसेनेसोबतच आहे गद्दारांसोबत नाही अशी टीका शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केली, तसेच आम्ही काय कमी दिलं की त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला? असा सवालही आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला विचारला आहे. (aaditya thackeray shivsena leader criticized cm eknath shinde and deputy cm devendra fadanvis over shivsena dasara melava)

Shiv Sena Dussehra Melava: दसरा मेळावा शिंदे गटाकडून हायजॅक? मेळाव्याच्या परवानगीबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले...

नागपूरमध्ये आल्यावर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवाजी पार्क मैदानावर होणार्‍या दसरा मेळाव्यासाठी आम्ही परवानगी मागितलेली आहे. परंतु हे नवे सरकार गद्दार आणि दडपशाहीचे सरकार आहे. या सरकारने दसरा मेळाव्यासाठी अद्याप परवानगी दिलेली नाही. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि परंपरा होती, ती परंपरा मोडून ही गद्दारी झालेली आहे. या गद्दारीची परंपरा हे खोके सरकार पुढे नेत आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.

हे पण वाचा : वयाच्या 13व्या वर्षी करिना 'याच्या' प्रेमात झाली होती वेडी

तसेच खोके सरकारमागे कोण होतं हे समोर आलेलं आहे. शिवसेना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेत आलेली आहे, आणि हे खोके सरकार किती टिकेल हे महाराष्ट्राला थोड्या दिवसाने कळेल. दसरा मेळाव्यासाठी आम्ही परवानगी मागत आहोत परंतु त्यासाठी परवानगी मिळत नाहिये आणि हे दडपशाहीचे सरकार आहे ते दडपशाही करत आहेत. खरी शिवसेना कुणाची आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. शिवसेनेने कधीही भूमिका सोडलेली नाही, शिवसेनेची भूमिका ही स्पष्ट राहिलेली आहे. आमचे हिंदुत्व सर्वांना पुढे नेणारे आहे. ही बाब ज्यांना ज्यांना मान्य असेल ते सोबत येतील. आम्ही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी पुढे आलो आणि महाविकास आघाडीची स्थापना केली अशी आदित्य ठाकरे म्हणाले.

अधिक वाचा : Ancient Statues : दुष्काळामुळे झालं बुद्धदर्शन! नदीखाली सापडल्या सहा शतकांपूर्वीच्या बुद्धांच्या मूर्ती

तसेच शिंदे गटाकडून शिवसेना हायजॅक करण्याचा प्रयत्न नसून या गद्दारांना एक निमित्त हवं होतं. जनतेसमोर त्यांचा बुरखा फाटलेला आहे. सध्या राज्यात जे राजकीय नाट्य सुरू आहे ते कुणालाही पसंत पडलेलं नाही. माझ्या शिवसंवाद यात्रेला तुफान प्रतिसाद मिळत आहे. सत्ताधारी पक्ष कधीच विधानभवनाच्या पायर्‍यांवर उभे नव्हते, या वेळी ते निर्लज्जपणे विधीमंडळाच्या पायर्‍यांवर उभे होते. आम्ही काय कमी दिलं की त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला?   असा सवालही आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला विचारला.

अधिक वाचा : सावधान! ‘तुम्ही प्रवेश घेतलेलं विद्यापीठ बनावट नाही ना?, पहिल्यांदा UGC ने जाहीर केली लिस्ट पाहा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी