Bacchu Kadu :शिंदे गटातील (Shinde group) आमदार आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा रस्ता क्रॉस करताना अपघात (Accident)झाल्याची माहिती मिळाली आहे. बच्चू कडू यांना अमरावतीच्या (Amravati)एका खासगी रुग्णालयात (Private hospitals) उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डोक्याला आणि उजव्या पायाला दुखावपत झाल्याची माहिती मिळाली आहे. सकाळी 6 ते साडे सहाच्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने धडक दिली आहे. यामध्ये बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्यानं डोक्याला मार लागला आहे. (Accident of MLA Bachu Kadu;severe head and leg injuries)
अधिक वाचा : लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
रस्ता ओलांडताना दुचाकीने बच्चू कडू यांना धडक दिल्यानं अपघात झाला. या अपघातात बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि पायला गंभीर इजा झाली आहे. त्यांच्यावर अमरावतीतल्या खासगी रुग्णालयात उचरास सुरु आहेत. दुचाकीनं धडक दिल्यानंतर बच्चू कडू रोडच्या डिव्हायडरवर आदळल्याने डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला आहे. बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत.
अधिक वाचा : लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचे फोटो
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांवर संकट आल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या अपघाताचे सत्र सुरु आहे. शिंदे गटातील दोन आमदारांचा अपघात झालाय. तसेच धनजंय मुंडे यांचाही अपघात झाल्याची घटनी घडलीय. काही दिवसापूर्वी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचाही अपघात झाला होता. या अपघातात त्यांना देखील गंभीर दुखापत झाली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला देखील अपघात झाला होता. तसेच माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांच्या गाडीचाही अपघात झाला होता.
कटोरा रोडवरील आराधना चौक जवळ आज सकाळी 6.15 वाजता बच्चू कडू रोड ओलांडत होते. त्यावेळी एका दुचाकीने त्यांना धडक दिली ज्यात बच्चू कडू यांना इजा झाली. कडू यांच्या उजव्या पायावर आणि डोक्यावर मार लागल्याने डोक्यावर चार टाचे पडले आहेत. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या रुग्णालयात कोणालाच एन्ट्री दिली जात नाहीये.
दुचाकीवरून धडक देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, अपघातानंतर बच्चू कडू यांनी फेसबुकवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला आहे. माझी प्रकृती ठीक असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया कोणाही भेटायला येऊ नये. अशी सर्व हितचिंतकांना बच्चू कडू यांनी विनंती केली आहे.