नागपूर : नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police) एका कारवाईमुळे मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीचे नाव ताडपत्री गॅंग (Tadpatri Gang) असं आहे. ताडपत्री गॅंगने अनेक राज्यात दरोडे घातले असल्याच्या घटना आता उघडकीस आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या गॅंगमध्ये गुजरातमध्ये घडलेल्या बहुचर्चित गोधरा जळीतकांड (Godhra Train Burning) प्रकरणातील काही आरोपी देखील आहेत. त्यामुळे, मोठी खळबळ उडाली आहे.
अधिक वाचा ;' जगभरात मंकीपॉक्सचे १३ हजार रुग्ण, भारतात ३ मंकीपॉक्स रुग्ण
दरम्यान, पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी फ्लिपकार्टच्या गोदामात दरोडा टाकत गोदाम लुटला. २३ जून रोजी सदर घटना घडली. यावेळी, दरोडेखोर गोदामातून लुटलेला माल कंटेनरमधून घेऊन जात होते. मात्र, गस्तीवर असलेल्या नागपूर ग्रामीण पोलिसांनी उमरेड इथे पोलिसांनी हा कंटेनर अडवला. यावेळी दरोडेखोरांनी गाडीतून खाली उतरत पोलिसांवर हल्ला केला आणि पोलिसांना रॉडने मारहाण करुन तिथून पळ काढला होता.
अधिक वाचा : शेफ संजीव कपूरने दिले गुलाबाचे मूळव्याधीसंदर्भातील फायदे
सदर घटनेपासून नागपूर ग्रामीण पोलीस या आरोपींच्या मागावर होते. यातील दोन आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. पोलिसांनी पकडलेल्या या आरोपीची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे हे दोघेही गोधराचे आहेत. तसेच सदर दरोड्यातील मुख्य आरोपी उस्मानगणी मोहम्मद कॉफीवाला हा जळीतकांडातील आरोपी असल्याचे समोर आले आहे.
अधिक वाचा ; आनंद महिंद्रांनी ट्विट केला मंगळावरून काढलेला पृथ्वीचा फोटो
१ ) उस्मान गणी मोहम्मद हा २००२ च्या गुजरात येथील गोधरा हत्याकांडाचा आरोपी आहे
२ ) गोधरा कांड प्रकरणात तो ८ वर्ष कारागृहाची शिक्षा भोगून आलेला आहे
३ ) उस्मान गणी मोहम्मदवर शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला, दंगल घडवणे, हत्या, जनावरांची तस्करी, घरफोडी, हत्येचा प्रयत्न, दरोडे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
४ ) मुख्य आरोपी उस्मान गणी मोहम्मद ५५ वर्षाचा आहे. तर त्याचा साथीदार जाफरु बांडी हा ४० वर्षाचा आहे.
५ ) आरोपीने कारागृहातून बाहेर आल्यावर ताडपत्री नावाने एक टोळी बनवली जी वेगवेगळ्या राज्यांमध्ये दरोडा टाकण्यासाठी कुप्रसिद्ध प्रसिद्ध आहे
आठ वर्ष जेलमध्ये राहिल्यावर त्याने जी ताडपत्री गँग बनवली ती चक्क कंटेनर घेऊनच दरोडा टाकायला निघायचे. आणि उभे मालवाहू ट्रकच्या ताडपत्री कापून संपूर्ण माल लुटून नेणे अशा प्रकारचे गुन्हे ही ताडपत्री गँग करत होती.