अमरावती : दोन दिवसांपूर्वी म्हणेच रविवारी रात्री दुल्हा गेट परिसरातील झेंडा काढल्याचा वादावरून अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात दोन समुदाय पुढे आल्याने तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी अनेकांवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकणी मोठी घडामोड घडताना दिसत आहे. अचलपूर (Achalpur) येथील दोन गटात झालेल्या हिंसाचारातील मुख्य आरोपी भाजप पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सदर पदाधिकारी हा भाजपचा असून, त्याचे नाव अभय माथने (BJP city president Abhay Mathane) असं आहे. पोलिसांनी पुण्यातून (Pune) अभय माथने याला अटक केली आहे. अचलपूर हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत २४ आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात केली आहे. अशी माहिती अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी दिली आहे. दरम्यान, अभय माथने याने सुरुवातीला झेंडा लावला आणि त्यानंतर हा मोठा वाद झाला असल्याचं बोललं जात आहे. नेमकी काय आहे घटना?
अधिक वाचा : Chromeचा उपयोग तुम्ही करताय मग गुगलचा इशारा एकदा वाचा
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात रविवारी रात्री दुल्हा गेट परिसरातील झेंडा काढल्याचा वादावरून दोन समुदाय पुढे आल्याने तणाव निर्माण झाला होता. यादरम्यान दोन्ही गटात दगडफेक झाली असून काही वाहनांची तोडफोड सुद्धा झाली आहे. तर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अश्रूधूर सुद्धा सोडण्यात आल्या होत्या. मात्र, पोलिसांनी घटनेची दखल घेत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जमाव पांगविला. तर घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांनी अचलपूर परतवाडा या दोन्ही जुळ्या शहरात संचारबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस कुमक सुद्धा बोलवण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी विनाकारण बाहेर न निघण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
अधिक वाचा ; सोन्याच्या तेजीला लागला ब्रेक, उच्चांकीवर घसरला सोन्याचा भाव
अचलपूर हिंसाचार प्रकरण, मुख्य आरोपी भाजप शहराध्यक्षाला पुण्यातून अटक