Nagpur Crime News: नागपुरातील यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरात एका महिलेवर अॅसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्कूटीवरुन आलेल्या बुरखाधारी व्यक्तीने विवाहित महिलेवर अॅसिड हल्ला केला. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पीडित महिलेसोबत तिचा अढीच वर्षांचा मुलगाही उपस्थित होता. (acid attack on nagpur woman shocking incident caught in cctv)
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही आपल्या मुलासह घरातून रविवारी सकाळच्या सुमारास निघाली. घरातून बाहेर पडताच समोरुन एक स्कूटी आली. या स्कूटीवर बसलेल्या दोघांनीही बुरखा घातला होता. यापैकी पाठीमागच्या व्यक्तीने स्कूटीवरुन उतरुन पीडित महिलेच्या अंगावर अॅसिड फेकण्याचा प्रयत्न केला.
ACID ATTACK IN BROAD DAYLIGHT IN NAGPUR — Mirror Now (@MirrorNow) December 6, 2022
"It is really unfortunate that women must also stoop to the same level that we see men have been stooping to all these years ," Women Rights Activist Zeenat Shaukat Ali to @iSamiakapoor pic.twitter.com/SBxICv2EuL
सुदैवाने या हल्ल्यात पीडित महिला आणि तिच्या मुलाला गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. पीडित महिलेच्या मुलाच्या हाताला दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. भरदिवसा झालेल्या अॅसिड हल्ल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
हे पण वाचा : कोणत्या राशीच्या व्यक्तीने कधी आणि कोणत्या महिन्यात लग्न करावे? वाचा
सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे की, दोन व्यक्ती स्कूटीवर बसून येतात. दोन्ही व्यक्तींनी बुरखा घातलेला आहे. ज्यावेळी यांची स्कूटी महिलेच्या जवळ जाते तेव्हा त्यापैकी एक व्यक्ती या महिलेच्या अंगावर अॅसिड हल्ला करतो. हा हल्ला केल्यावर बुरखाधारी दोन्ही हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला.
हे पण वाचा : बहुतेक स्वयंपाकघरात केली जाते ही चूक
या घटनेप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेज आणि इतर माहितीच्या आधारे पोलीस आपला तपास करत आहेत. तसेच पीडित महिला आणि तिच्या कुटुंबीयांची सुद्धा पोलीस चौकशी करत आहेत. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून तर झालेला नाहीये ना? याचाही शोध पोलीस घेत आहेत.