तर गोपीचंद पडळकरांवर कारवाई करणार : गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई

नागपूर
अजहर शेख
Updated Jun 29, 2020 | 20:21 IST

Action will be taken against Gopichand Padalkar: राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई गोपीचंद पडळकर यांच्यावर व्हिडीओचा अहवाल येताच कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Action will be taken against Gopichand Padalkar
तर.. गोपीचंद पडळकरांवर कारवाई करणार- गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • व्हीडीओचा अहवाल आल्यानंतर पुढची कारवाई लगेच करण्यात येणार
  • वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ आणि ऑडिओचा तपास सुरु
  • पडळकारां विरोधात बीड आणि बारामतीत गुन्हा दाखल

वाशीम: भारतीय जनता पार्टीचे (bjp) विधान परिषदेचे (vidhan parishad)आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर काही दिवसांपूर्वी जहरी टीका केली होती. त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओचा अहवाल आल्यानंतर पुढची कारवाई लगेच करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री (home minister) शंभूराज देसाई (shambhuraje desai) यांनी सांगितली आहे. दरम्यान ते वाशीम (vashim) येथे आयोजित पत्रकार परिषदेत (prass conference) बोलत होते.

काय म्हणाले गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई?

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ आणि ऑडिओचा तपास सुरू आहे.  त्याचा अहवाल देखील लवकरच प्राप्त होईल. ज्या दिवशी गोपीचंद पडळकर यांनी हे विधान केल होते, त्या दिवशीच राज्याच्या पोलीस महासंचालकांना याबद्दल सूचना दिल्या आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे. याचा अहवाल लवकर प्राप्त होईल. अहवाल प्राप्त होताच पुढची कारवाई केली जाईल.

पडळकारां विरोधात बीड आणि बारामतीत गुन्हा दाखल 

राष्ट्रवादी कॉंग्रसचे अध्यक्ष शरद पवार याच्यावर जहरी टीका केल्यानंतर पडळकर यांच्या विरोधात पहिला गुन्हा बारामती येथे दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादी कॉंग्रसचे शहराध्यक्ष यांनी फिर्याद दिली असता महाराष्ट्रातील पहिला गुन्हा नोंदवून घेतला गेला होता.तर दुसरा गुन्हा हा बीड येथील शिरुर कासार येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रसचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी हा गुन्हा नोंद करून घेतला होता.

काय म्हणाले होते पडळकर?

भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे नवनिर्वाचीत आमदार गोपीचंद पडळकर हे पंढरपूर येथे गेले असताना त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. गोपीचंद पडळकर म्हणाले होते, 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. शरद पवार यांनी बहुजन लोकांवर अन्याय केला असल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे'. 

पडळकरांच्या टीकेवर काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार हे साताऱ्याच्या दौऱ्यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत त्यांना गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता, मी पडळकर यांना खूप महत्व देत नसल्याचे बोलले होते. त्यांचं बारामती येथे डिपॉझिट जप्त झालं आहे. त्यामुळे त्यांच्यावर काय बोलणार असं यावेळी पवार म्हणाले होते. 

अजित पवारांनी पडळकर यांना काय दिले प्रत्युत्तर?

सातारा  येथील आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. पवार म्हणाले की, ज्या नेत्यांचे डिपॉझिट जप्त जाहे आहे. त्या लोकांबद्दल काय बोलावे. तसेच सूर्याकडे पाहून थुंकल्यास थुंकी तोंडावरच येते, लायकी नसलेल्या लोकांनी बोलण योग्य नाही. जनतेने त्यांची जागा दाखवली असून, आपल्या समाजात प्रसिद्धी मिळवण्यासाठी असा प्रयत्न केला जातो. एखाद्याला नको तेवढ मोठ करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका देखील अजित पवार यांनी केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी