अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

actor who worked in the movie Jhund was arrested ; महानायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणाऱ्या एका अभिनेत्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या अभिनेत्याचे नाव प्रियांशू क्षत्रिय असं आहे.

 actor who worked in the movie Jhund was arrested
झुंड चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्याला बेड्या   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणाऱ्या एका अभिनेत्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या
  • झुंड चित्रपटात केले आहे अटक केलेल्या अभिनेत्याने काम
  • 25 नोव्हेंबरपर्यंत प्रियांशूला सुनावण्यात आली पोलीस कोठडी

नागपूर : महानायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणाऱ्या एका अभिनेत्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या अभिनेत्याचे नाव प्रियांशू क्षत्रिय असं आहे. प्रियांशू क्षत्रिय हा 18 वर्षीय असून, त्याने अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रख्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' या चित्रपटात काम केले आहे. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केल्या प्रकरणी प्रियांशूला अटक करण्यात आली आहे. प्रियांशूने 'झुंड' चित्रपटात बाबू ही व्यक्तिरेखा साकारली होती. दरम्यान, तो या चित्रपटापासून खूप प्रसिद्ध देखील झाला होता.

अधिक वाचा ; उद्धव ठाकरे कडाडले,कर्नाटकच्या CMचा ठाकरी शैलीत घेतला समाचार

25 नोव्हेंबरपर्यंत प्रियांशूला सुनावण्यात आली पोलीस कोठडी

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील मनकापूर भागातील रहिवासी असलेल्या 64 वर्षीय प्रदीप मोंडावे यांनी पोलीस ठाण्यात एक तक्रार दिली होती. मोंडावे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं होत की, त्यांच्या नागपुरातील राहत्या घरातून सोन्याचे दागिने आणि पाच लाख रुपयांची रोख रक्कम चोरी झाली आहे. त्यानुसार, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला होता आणि यामध्ये एका अल्पवयीन संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाने या गुन्ह्यात प्रियांशू क्षत्रियचा सहभाग असल्याचा दावा केला. त्यानंतर मंगळवारी पोलिसांनी प्रियांशूला अटक केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रियांशू क्षत्रिय याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अधिक वाचा ; स्वत:हून राजीनामा द्या, मिळतील चांगले फायदे, अ‍ॅमेझॉनची ऑफर

प्रियांशू क्षत्रियला यापूर्वी रेल्वे प्रवाशांचे मोबाईल फोन चोरल्याप्रकरणी अटक झाली होती

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांशू क्षत्रियला यापूर्वी रेल्वे प्रवाशांचे मोबाईल फोन चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. समीक्षकांनी गौरवलेल्या झुंड हा हिंदी भाषेतील चित्रपट विजय बारसे या माजी क्रीडा शिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना गुन्हेगारी आणि व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी फुटबॉलशी परिचय करुन दिला.

अधिक वाचा ; मी मारायला आणि मरायला पण घाबरत नाही स्टेटस ठेवून झाला मृत्यू

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी